कारबॉम्ब हल्ल्याप्रकरणी चारजणांना मृत्युदंड

- हाफिज सईद याच्या घराबाहेरील स्फोट

    दिनांक :14-Jan-2022
|
लाहोर,
पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तसेच जमात उद् दावा संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्या घराबाहेर केलेल्या car bomb attack कार बॉम्बस्फोट प्रकरणात चारजणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणात एका महिला आरोपीला पाच वर्षांची कैद दिली आहे.
 
lahoree
 
माहितीनुसार, हाफिज सईद याच्या जोहर टाऊनस्थित घराबाहेर 23 जून 2021 रोजी कारमधून घडवून आणलेल्या बॉम्ब हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. तसेच, अनेक घरे आणि दुकानांचेही नुकसान झाले होते. या प्रकरणात प्रतिबंधित तहरिक -ए- तालिबान पाकिस्तान संघटनेचे ईद गुल, पीटर पॉल डेव्हिड, सज्जाद शाह आणि जियाउल्लाह यांना दोषी ठरवण्यात आले. यानंतर दहशतवादविरोधी न्यायालयाचे (एटीसी) न्यायाधीश अर्शद हुसेन यांनी चौघांना मृत्युदंड सुनावला. सरकारी पक्षाने एकूण 56 साक्षीदार सादर केले. पीटर पॉल याच्या मालकीच्या कारमध्ये गुल याने स्फोटक पदार्थ लावले होते. सज्जाद, जियाउल्लाह आणि आयशा बिबी यांनी या car bomb attack घटनेत पूर्णपणे सहकार्‍यांची भूमिका बजावली होती. मागील आठवड्यात न्यायालयाने आयशा बीबी हिची जमानत याचिका नाकारली होती.
 
 
दरम्यान, सईद हा सध्या दहशतवाद निधी प्रकरणात कोट लखपत तुरुंगात कैदेत आहे. संयुक्त राष्ट्रांनी त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले असून, अमेरिकेने त्याच्यावर एक कोटी डॉलरचे बक्षीस घोषित केले आहे.