इंडिया ओपन स्पर्धेचे प्रसारण सोनी टीव्हीवर

    दिनांक :14-Jan-2022
|
नवी दिल्ली,
भारतीय बॅडमिंटन संघटनेने Indian Badminton Association सध्या येथे सुुरु असलेल्या योनेक्स-सनराईज इंडिया ओपन बॅडमिंटन-2022 स्पर्धेसाठी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाला विशेष प्रसारण भागीदार म्हणून जाहीर केले. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर बीडब्ल्यूएफ सुपर 500 स्पर्धा बंदव्दारात ही स्पर्धा होत आहे, परंतु आता सोनी नेटवर्क्सला विशेष प्रसारण भागीदार म्हणून नियुक्त केल्याने प्रेक्षकांना या स्पर्धेतील रोमांचक सामने टीव्हीवर बघण्याची संधी मिळणार आहे.
 
 
INDIA-OPEN
 
सोनी टेन 1 वाहिनीवर तसेच सोनी लीव्हवरसुद्धा सामन्याचे थेट प्रसारण केले जाईल. उपांत्यपूर्व फेरीपासून प्रेक्षक सामन्यांचा आनंद लुटू शकतील, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे Indian Badminton Association सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी म्हटले आहे. या भागीदारीमुळे प्रेक्षक आता घरी बसून भारतात खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेतील जागतिक दर्जाचे बॅडमिंटन सामने बघू शकतील, असेही ते म्हणाले. या स्पर्धेत अव्वल खेळाडूंमध्ये विद्यमान विश्वविजेता लोह कीन यू व कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन तसेच दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचा प्रामु‘याने समावेश आहे.