‘महाज्योती’चा करडई प्रकल्प रोजगाराभिमुख

-विजय वडेट्टीवार यांची माहिती

    दिनांक :14-Jan-2022
|
नागपूर, 
नागपूरसह विदर्भातील सात जिल्ह्यात करडई उत्पादन तसेच करडई तेल विपणन असा पथदर्शी प्रकल्प महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) राबविणार असल्याची माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री आणि ‘महाज्योती’चे अध्यक्ष विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
 
nagbh
 
नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशीम, अकोला व बुलडाणा या सात जिल्ह्यातील अंंदाजे 16 हजार एकर जमिनीवर करडई तेलबिया उत्पादन, प्रक्रिया, विपणन प्रकल्प राबविला जाणार आहे. लाभधारक शेतकर्‍यांना तेलबिया करडई बियाणे उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करणे, त्यांच्याकडून तेलबिया खरेदी करणे, त्यावर प्रकि‘या करून त्यातून येणार्‍या उत्पादनाच्या विक्रीद्वारे होणार्‍या नफ्याचे शेतकर्‍यांना वाटप करणे, असा हा प्रकल्प डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तेलबिया उत्पादन, विकास क्षेत्रातील तज्ञ संशोधक, शास्त्रज्ञ, शासनाच्या कृषी विभागातील अनुभवी अधिकारी यांच्या सहकार्याने राबविला जाईल.
 
 
नोंंदणीकृत सातही जिल्ह्यातील 6949 शेतकर्‍यांना 6464.45 हेक्टर म्हणजेच 16162 एकर क्षेत्रासाठी प्रति एकर 4 किलोप्रमाणे एकूण 646.60 क्विंटल बियाणे मोफत वाटण्यात आले. या लाभार्थी शेतकर्‍यांना प्रति एकर 2,200 रु. खते, कीटकनाशक, पीक संवर्धक औषधे यासाठी अर्थसहाय्य केले जात असून एकूण खर्च 3 कोटी 55 लाख रु. अपेक्षित आहे. उत्पादित तेलबिया खरेदी, वाहतूक, साठवणूक, प्रकि‘या यावरील खर्च 47 कोटी 77 लाख रु. आहे. उत्पादित तेल व ढेप यांच्या विक्रीतून 52 कोटी 88 लाख रु. उत्त्पन्न अपेक्षित आहे. एकूणच व्यवहारात 5 कोटी 11 लाख रु. नफा अपेक्षित असून तो शेतकर्‍यांना उत्पादित तेलबियांच्या प्रमाणात परत दिला जाईल. तेलघाणीसाठी यंत्रसामुग्री, प्रशिक्षण, विपणन यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
 
 
या प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना ‘महाज्योती’कडून प्रतिएकर अर्थसहाय्य व बियाणे मिळून 2520 रु. व उत्पादित मालाची खरेदी 5400 रु. एकरी 5 क्विंटर उत्पादन गृहित धरून होणारे रु. 27 हजार, अंतिम नफ्याचे रु. 3408, असे एकूण 32 हजार 928 रुपयेपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. या प्रकल्पातून आरोग्यवर्धक तेलाचा ब्रँड तयार होणार असून त्याद्वारे शेतकर्‍याला रब्बी हंगामासाठी हमखास उत्पन्नाची सोय हमखास होणार असल्याचे वडेट्टीवार Vijay Vadettiwar म्हणाले.
 
 
‘महाज्योती’च्या इतरही विवि योजनांची माहिती देण्यात आली. ‘महाज्योती’ला केवळ सव्वा वर्षे झाली असून यात शक्य ते सर्व केले जात आहे. हे काम प्रामाणिकतेने, पारदर्शीपणे केले जात असून उगाचच राजकारणासाठी कुणी आरोप करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिवाकर गमे तसेच डॉ. बबन तायवाडे उपस्थित होते.