युवा स्वाभिमानचा पतंग महोत्सव

अनेकांनी घेतला सहभाग

    दिनांक :14-Jan-2022
|
तभा वृत्तसेवा
अमरावती,
युवा स्वाभिमानचा पार्टीच्यावतीने शुक्रवारी आयोजित पतंग महोत्सवात शकडो बालकांसोबत आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला.
 
Kite Festival
 
थानिक न्यू हायस्कुल, बेलपुरा येथील मैदानात प्रा. अजय मोरया, जयश्री मोरया यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे हा महोत्सव आयोजित केला. कार्यक्रमात शेकडो लहान मुला, मुलींना पतंग, धागा व चक्कर वाटप करण्यात आले. सोबतच प्रत्येकाला तिळगुळाचे लाडूही देण्यात आले. राणा दाम्पत्याने सर्व नागरिकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत उंच उडणार्‍या पतंगीप्रमाणे प्रत्येकाचा विकास व्हावा व सर्वांच्या आयुष्यात तिळगुळाचा गोडवा निर्माण होऊन सर्वांचे कल्याण व्हावे, अशी शुभकामना व्यक्त केली. त्यांनी मुलगा रणवीर व इतर लहान बालकांसोबत 15 फूट मोठी पतंग उडवून पतंगबाजी व पेचलढाईचा आंनद घेतला. यावेळी समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया, जयंत वानखडे, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शैलेंद्र कस्तुरे, जिल्हा संघटक अभिजित देशमुख, निलेश भेंडे, पराग चिमोटे, अजय बोबडे, सुधीर लवणकर, मंगेश कोकाटे, सचिन सोनोने यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.