दोन वर्षांत देशातील जंगलव्याप्त क्षेत्रात मोठी वाढ

    दिनांक :14-Jan-2022
|
नवी दिल्ली,
मागील दोन वर्षांत भारतातील indian forest वृक्ष आणि जंगलव्याप्त क्षेत्र 2 हजार 261 चौरस किलोमीटर्सनी वाढले आहे. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (आयएसएफआर) 2021 मध्ये या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. देशात आंध्रप्रदेशात सर्वाधिक 647 चौरस किमी वनक्षेत्रात वाढ झाली आहे.
 
natref
 
केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी देशातील वनसंपदेचे मूल्यांकन करण्यासाठी फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियासंबंधी (एफएसआय) द्विवार्षिक अहवाल जाहीर केला. त्यात वरील बाबी नमूद केल्या आहेत. 2019 च्या तुलनेत देशातील वन आणि वृक्षक्षेत्रात एकूण 1 हजार 540 चौरस किमी वनक्षेत्र आणि 721 चौरस किमी वृक्षक्षेत्रात वाढ झाली.
 
 
भारतातील एकूण वन आणि वृक्षक्षेत्र indian forest आठ कोटी नऊ लाख हेक्टर्सवर पोहोचले आहे. हे प्रमाण भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के इतके आहे. आंध्रप्रदेशात सर्वाधिक 647 चौ. किमी क्षेत्राची वाढ झाली आहे. याशिवाय तेलंगणा (632 चौ. किमी), ओडिशा ( 537 चौ. किमी), कर्नाटक ( 155 चौ. किमी) आणि झारखंड (110 चौ. किमी) वनाच्छादित वाढीच्या बाबतीत आघाडीची राज्ये आहेत.
 
 
देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र indian forest असलेले राज्य मध्य प्रदेश आहे. यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्राची नोंद झाली आहे. सध्याच्या मूल्यांकनानुसार, देशातील 17 राज्ये-कें द्रशासित प्रदेशांमध्ये 33 टक्के भौगोलिक क्षेत्र जंगलांनी व्यापलेले आहे.