जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द

    दिनांक :14-Jan-2022
|
मेलबर्न,
Novak jokovic : ऑस्ट्रेलियन सरकारने दुसर्‍यांदा नोवाक जोकोविचचा Novak jokovic  व्हिसा रद्द केला असून त्याला पुन्हा हद्दपारीचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात जोकोविच पुन्हा न्यायालयात दाद मागत आहे. सार्वजनिक आरोग्य व उत्तम सुव्यवस्थेच्या कारणास्तव सर्बियाच्या 34 वर्षीय जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द करण्यात येत आहे, असे ऑस्ट्रेलियाचे मंत्री अ‍ॅलेक्स हॉके टांनी शुक‘वारी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन सुरू होण्याच्या तीन दिवस आधी ऑस्ट्रेलियन सरकारने हा निर्णय घेतला आहे. मॉरिसन सरकार ऑस्ट्रेलियाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी विशेषत: कोरोना साथीच्या आजाराच्या संदर्भात वचनबद्ध आहे, असे हॉक यांनी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा संदर्भ देत एका निवेदनात म्हटले आहे.
 
 
JOKOVICH 2
 
ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी जोकोविच Novak jokovic गेल्या आठवड्यात मेलबर्नमध्ये आल्यापासून त्याचा व्हिसा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. स्पर्धेसाठी लसीकरण नियमातून त्याला व्हिक्टोरिया राज्य सरकार आणि स्पर्धेचे आयोजक टेनिस ऑस्ट्रेलियाने सूट दिली होती. त्यामुळे त्याला प्रवासासाठी व्हिसा मिळू शकला, परंतु मेलबर्नमध्ये तो दाखल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी त्याला ही सूट नाकारली. त्याचा व्हिसा रद्द केला व त्याला ताब्यात घेतले.त्यामुळे जोकोविचलाNovak jokovic न्यायालयात धाव घ्यावी लागली व चार दिवस-रात्री हॉटेलमध्ये ताब्यात ठेवण्यात आले होते. अखेर गत सोमवारी जोकोविचने Novak jokovic न्यायालयीन लढाई जिंकली. जोकोविचला पुढील आठवड्यात खेळण्याची परवानगी मिळविण्यासाठी आठवड्याच्या अखेरीस न्यायालयाचे अनुकूल आदेश मिळविणे अत्यंत कठीण असेल, असे त्याचे वकील कियान बोन म्हणाले.