हिंदुत्व हा देशासाठी धोका

    दिनांक :14-Jan-2022
|
- पाकिस्तानचे पहिले सुरक्षा धोरण जाहीर
 
इस्लामाबाद, 
पाकिस्तानला Pakistan स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय सुरक्षा धोरण आखण्यात आले असून, त्याची औपचारिक घोषणा पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. या धोरणात पाकिस्तानच्या Pakistan आर्थिक हिताचा प्राधान्याने विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. भारतातील हिंदुत्व, आक्रमकता आणि गैरसमज पसरवणे पाकिस्तानसाठी धोका असल्याचे या धोरणात नमूद करण्यात आल्याची माहिती एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्राने दिली आहे.
 
 
imran 5
 
पाकिस्तानचे Pakistan आतापर्यंतचे धोरण पूर्णतः लष्करकेंद्रित राहिले आहे. आता मात्र केवळ लष्करी ताकदीच्या पलीकडे जाऊन पाकिस्तानचा Pakistan आर्थिक विकास आणि सर्वांगिण सुधारणा या दृष्टीने नवे धोरण आखण्यात आले आहे. पाकिस्तानला Pakistan स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आली, तरीदेखील एकही सुरक्षा धोरण तयार झाले नव्हते. गेल्या 75 वर्षातील निम्मा काळ हा पाकिस्तानमध्ये Pakistan लष्करी सत्तेचा होता. त्यामुळे सतत अस्थिर असणारा पाकिस्तान Pakistan आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत गेल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. परराष्ट्र धोरणाचा विचार करता भारतासोबत सलोख्याचे संबंध ठेवणे आपल्या हिताचे राहील, असे पाकिस्तानने Pakistan म्हटले आहे. मात्र, भारतातील आक्रमक हिंदुत्व आणि चुकीची माहिती पसरवण्याचे प्रकार या दोन गोष्टी धोकादायक ठरू शकत असल्यामुळे त्यापासून सावध राहण्याची गरज असल्याचे मत या धोरणात मांडण्यात आले आहे.
भारताशी पंगा नाही
पुढील किमान 100 वर्षं भारतासोबत कुठलाही पंगा घेण्याची पाकिस्तानची Pakistan इच्छा नसून, दोन्ही देशात सौहार्दपूर्ण संबंध राहावे, असे हे धोरण सांगते. काश्मीरचा वादग्रस्त प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न एका बाजूला सुरूच राहतील, पण त्यामुळे भारतासोबतच्या व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधात अडथळे येऊ नये, अशी अपेक्षा असल्याचे या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.