कार पार्किंगसाठी मॉल शुल्क आकारू शकत नाही

    दिनांक :14-Jan-2022
|
- केरळ उच्च न्यायालयाचा निवाडा
 
तिरुवनंतपुरम्, 
Parking Fee : शॉपिंग मॉलला कार पार्किंगसाठी शुल्क Parking Fee वसूल करण्याचा कोणताही अधिकार नसून, असा प्रकार कोणताही मॉल करीत असल्यास, ते बेकायदेशीर कृत्य ठरविले जाईल, असे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भातील दोन याचिकांवर निकाल देताना हा निवाडा दिला. मॉल बेकायदेशीरपणे ग्राहकांकडून शुल्क Parking Fee वसूल करीत असल्याच्या याचिकेवर न्यायालयाने राज्य सरकार, एक नगरपालिका आणि एर्नाकुलम् येथील लुलू इंटरनॅशनल शॉपिंग मॉलला नोटीस बजावली होती.
 
 
Kerala High Court
 
न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन् यांनी सरकार, कलामासेरी नगरपालिका आणि मोठ्या मॉल्सकडून त्यांची भूमिका मागितली होती. लुलू मॉल कोणत्याही अधिकाराशिवाय पार्किंग शुल्क Parking Fee वसूल करीत असल्याची याचिकाकर्त्यांची तक्रार होती. तथापि, वरिष्ठ अधिवक्ता एस. श्रीकुमार यांनी प्रतिवादींच्या बाजूने उपस्थित राहून, केरळ नगरपालिका कायद्याच्या कलम 447 अंतर्गत परवाना देण्यात आला असल्याचे सांगितले. मात्र, शॉपिंग मॉलकडून पार्किंग शुल्काची Parking Fee वसुली योग्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.