आदित्य ठाकरे राहणार ‘रायगडा’वर

    दिनांक :14-Jan-2022
|
- मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
 
मुंबई, 
Renaming of Government Bungalows :राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीतच असाव्या, हा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांची नावे Renaming of Government Bungalows बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय झाला आहे.
 
 
thakare aditya
 
सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला. त्यानुसार मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचे नामांतर Renaming of Government Bungalows करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांच्या शासकीय बंगल्याला रायगड असे नाव देण्यात आले आहे तर जितेंद्र आव्हाड यांचा बंगला शिवगड, अमित देशमुख यांचा बंगला जंजिरा या नावाने ओळखला जाईल. याशिवाय विजय वडेट्टीवार- सिंहगड, वर्षा गायकवाड- पावनगड, उदय सामंत- रत्नसिंधू, केसी पाडवी- प्रतापगड, हसन मुश्रीफ- विजयदुर्ग आणि दादा भुसे- राजगड अशी मंत्र्यांच्या बंगल्यांची नावे राहणार आहेत.