2021 हे 1901 नंतरचे पाचवे सर्वांत उष्ण वर्ष

    दिनांक :14-Jan-2022
|
- हवामान खात्याची माहिती
 
नवी दिल्ली, 
Temperature : कार्बन डायऑक्साईड आणि अन्य वायूंमुळे पृथ्वीचे तापमान Temperatureवाढत आहे. त्याचप्रमाणे हवामानातील बदलांमुळेही प्रादेशिक स्तरावरही तापमानात बदल होतात. अशाच काहीशा हवामान बदलामुळे 2021 हे भारतातील 1901 नंतरचे पाचवे सर्वांत उष्ण वर्ष ठरल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने आज शुक्रवारी दिली आहे.
 
 
Indian air eater
 
वातावरणातील बदलामुळे निसर्गाचे उग्र रूप बरेचदा अनुभवाला येते. त्यातून पूर, चक्रीवादळे, अतिवृष्टी, दरड कोसळणे, वीज पडणे अशा घटना घडतात. त्यात भारतात 1,750 मृत्यू नोंदविण्यात आले. 2021 हे 1905 पासूनचे पाचवे सर्वांत उष्ण वर्ष राहिले आहे. त्यापूर्वी 2016, 2009, 2017 आणि 2010 या वर्षांची उष्ण वर्ष नोंद झाली आहे. 2021 मध्ये हवेचे वार्षिक तापमान Temperature सरासरीपेक्षा 0.44 अंशांनी जास्त होते. त्यातही हिवाळ्यात वाढलेले तापमान हे या वर्षातील वैेशिष्ट्यच म्हणावे लागेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
 
 
2016 मध्ये वार्षिक तापमान Temperature  सरासरीपेक्षा 0.710 अंश सेल्सिअसने जास्त होते. ते 2009 आणि 2017 मध्ये अनुक्रमे 0.550 आणि 0.541 अंश सेल्सिअस होते. 2010 मध्ये 0.539 अंश इतक्या तापमानाची Temperature नोंद करण्यात आली. 2021 मध्ये वादळ आणि वीज पडल्याने जवळपास 787 जणांचा मृत्यू झाला. तसेच अतिवृष्टी आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये 759 जणांचा बळी गेला. चक्रीवादळामुळे 172 जण मृत्युमुखी पडले तर अन्य 32 जण हवामानाशी संबंधित तीव्र तेमुळे दगावल्याचे नोंदविण्यात आले आहे, याकडे हवामान खात्याने लक्ष वेधले.