'कोन नाय कोन्चा' सिनेमा अडचणीत

    दिनांक :14-Jan-2022
|
मुंबई,
Kon Nai Koncha नेहमी वैविध्यपूर्ण कथा, विषय मांडणारे अशी लेखक-दिग्दर्शक 'महेश मांजरेकर' यांची सिनेसृष्टीत ओळख आहे. त्यांनी सिनेव्यवसायाची गरज म्हणून व्यावसायिक सिनेमे बनवले; पण समाजातील वास्तविकता पडद्यावर प्रतिबिंबित करणारे मार्मिक सिनेमेही त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केले. आता पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवणारा एक सिनेमा ते घेऊन येत आहेत. 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' असं या सिनेमाचं नाव आहे.
 
mama  
 
Kon Nai Koncha नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच,१४ जानेवारी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील काही दृश्यांवर टीका झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगानेही या दृष्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच, त्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेची आक्षेपार्ह स्थितीमधील दृश्य दाखवण्यात आली होती. आणि याच मुद्द्यावरून हा वाद सुरु झाला आहे.