नितीशकुमारांचीही उत्तरप्रदेश निवडणुकीत उडी, जागा वाटपासाठी दबाव

    दिनांक :14-Jan-2022
|
पाटणा, 
Uttar Pradesh Elections : भाजपासोबत बिहारमध्ये सत्तेत असलेल्या नितीशकुमार nitishkumar यांच्या नेतृत्वातील जदयूने उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत Uttar Pradesh Elections उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. जदयूने जागा वाटपासाठी दबाव वाढवल्याची माहिती आहे.
 
 
nitishkumar
 
लालूप्रसाद यादव यांचा राजद वगळता बिहारमधील सक्रिय सर्वच प्रमुख पक्षांनी उत्तरप्रदेश निवडणुकीत Uttar Pradesh Elections उडी घेतली आहे. यात महाराष्ट्रातील शिवसेनाचाही समावेश आहे. भाजपा आणि जदयूमध्ये पुढील दोन दिवसांत जागा वाटप होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अपना दल आणि निषाद पार्टीसोबत भाजपाची पहिली बैठक पार पडली. परंतु, मागील तीन दिवसांत आमदार आणि मंत्र्यांनी भाजपाचा त्याग केल्याने जदयूने आपल्या संभाव्य जागांबाबत भाजपावर दबाव वाढविला आहे. जदयूने 36 जागांची यादी भाजपा नेतृत्वाकडे सोपवली असून, यापैकी बहुतांश बिहार सीमेलगतच्या क्षेत्रातील आहेत.