दक्षिण आफ्रिकेच्या दुबळ्या संघाने जिंकली कसोटी क्रिकेटची मालिका

    दिनांक :14-Jan-2022
|
केपटाऊन,
Victory of Africa :विराट कोहलीच्या Virat Kohli नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती, परंतु अनुभवी खेळाडूंनीच भारताची नौका बुडवली. टेम्बा बावुमा (32) व रॅस्सी व्हॅन डेर दुस्सानने (41) नाबाद खेळी करीत दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्याच दिवशी 7 गडी राखून विजय मिळवून दिला. बावुमा व दुस्सानने चौथ्या गड्यासाठी नाबाद 57 धावांची विजयी भागीदारी केली. टेम्बाने आर. अश्विनच्या चेंडूवर चौकार हाणत दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर Victory of Africa शिक्कामोर्तब केला. या विजयासह यजमान दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली.
 
 
AP01_14_2022_000128B
 
भारताने सेंच्युरियन येथे सलामीचा कसोटी सामना 113 धावांनी जिंकून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली होती, परंतु त्यानंतर जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेने जोरदार मुसंडी मारीत दुसरा सामना 7 धावांनी जिंकून मालिकेत बरोबरी साधली. आता तिसरा व अंतिम कसोटी सामना जिंकून भारताला दक्षिण आफि‘केत त्यांच्या दुबळ्या संघाविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती, परंतु भारताच्या अनुभवी खेळांडूनीच ही संधी गमावली.
 
 
विजयासाठी 212 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी 2 बाद 101 धावांवरून पुढे खेळत उपाहारापर्यंत 3 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली व मालिका विजयाच्या दिशेने आपली आगेकूच कायम राखली. सकाळच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने 70 धावा केल्या, परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी केवळ एक फलंदाज गमावला. कालचा नाबादवीर किगन पीटरसनने 82 धावांची खेळी करीत दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या Victory of Africa उंबरठ्यावर पोहोचवले. पीटरसनने 113 चेंडूंत 10 चौकारांसह 82 धावांचे योगदान दिले. पुढे रॅस्सी व्हॅन डेर दुस्सेन व टेम्बा बावुमाने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला व नाबाद खेळी करीत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व शार्दुल ठाकूरने आफ्रिकेच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न बावुमा व दुस्सेनने हाणून पाडले.
 
धावफलक
भारत पहिला डाव : 223.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव :210.
भारत दुसरा डाव : 198.
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव : 63.3 षटकात 3 बाद 212.
मार्कराम झे. राहुल गो. मोहम्मद शमी 16, डीन एल्गर झे. पंत गो. बुमराह 30, किगन पीटरसन त्रि. गो. ठाकूर 82, रॅस्सी व्हेन दुस्सेन नाबाद 41, टेम्बा बावुमा नाबाद 32, अवांतर 11.
गडी बाद क्रम : 1-23, 2-101, 3-155.
गोलंदाजी : जसप्रीत बुमराह 17-5-54-1, मोहम्मद शमी 15-3-41-1, उमेश यादव 9-0-36-0, शार्दुल ठाकूर 11-3-22-1, रविचंद्रन अश्विन 11.3-1-51-0.