कोहलीचा उद्रेक अपरिपक्व

    दिनांक :14-Jan-2022
|
-गौतम गंभीरची टीका

नवी दिल्ली, 
Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान डीआरएसच्या वादग्रस्त निर्णयाविरोधात विराट कोहलीचा उद्रेक अपरिपक्वहोता व अशा अतिरंजित प्रतिक्रियेमुळे भारताचा कर्णधार युवकांसाठी कधीही आदर्श ठरू शकणार नाही, अशी टीका भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने Gautam Gambhir केली आहे.
 
 
gautam gabhir
 
कोहली, उपकर्णधार लोकेश राहुल व फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने स्टम्प माइकमध्ये पंच व तंत्रज्ञानाबद्दल काही अप्रिय टिप्पण्या केल्या. दक्षिण आफि‘का संघाचा कर्णधार डीन एल्गरला सामन्याच्या तिसर्‍या दिवशी शेवटच्या तासात वादग‘स्त डीआरएस निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. ज्या पद्धतीने कोहलीने या निर्णयाचा विरोध केला, तो खरोखरच वाईट आहे. एखाद्या भारतीय कर्णधाराकडून अशी अपेक्षा नाही, गंभीरने Gautam Gambhir स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले.