कोरोनावरील नव्या औषधाला डब्ल्यूएचओची मान्यता

    दिनांक :14-Jan-2022
|
- मार्गदर्शक नियमावली केली जाहीर
 
न्यू यॉर्क, 
global health organization : जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने global health organization कोरोनावरील नव्या औषधाला मान्यता दिली आहे. एली लिली आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाईनने संयुक्तपणे तयार केलेल्या बारिसिटिनिब या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने global health organization मान्यता दिली आहे. ओल्युमियांट या नावाने हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार असून, जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाची शिफारस केली आहे.
 
 
who 4
 
जागतिक आरोग्य संघटनेने global health organization दिलेल्या आकडेवारीनुसार, ओमिक्रॉनचा जगभरातील देशांमध्ये प्रसार झाला आहे. अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन वेगाने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेऊ लागला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेथील सरकारांनी बुस्टर अर्थात् वर्धित मात्रा, तपासणी आणि उपचारांमध्ये वाढ केली आहे. याच पृष्ठभूमीवर डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञ समितीने लिलीच्या बॅरिसिटिनिब औषधाला मान्यता दिली आहे.
 
 
ऑल्यूमिआंट या नावाखाली उपलब्ध असलेले हे औषध कोरोनाची तीव‘ लक्षणे असणार्‍या बाधितांनाच देता येऊ शकेल. तसेच, कॉर्टिकोस्टेरॉईडसोबतच हे औषध देता येऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देतानाच आवश्यक त्या नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ओल्युमियांटसोबतच जीएसके-वीर कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचाही सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मात्र, ओल्युमियांटपेक्षा ही थेरपी कमी प्रमाणात परिणामकारक ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर संबंधित देशांनी या दोन्ही उपचार पद्धतींविषयी निर्णय घ्यायचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून global health organization स्पष्ट करण्यात आले आहे.