आर्थर रोड कारागृहाने अडवली अनिल देशमुखांची वाट

    दिनांक :14-Jan-2022
|
- आयोगाने व्यक्त केला संशय
 
मुंबई, 
karagrah : 100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदीवाल आयोगापुढे आजही हजर राहिले नाही. आजही काहीच काम होऊ न शकल्यामुळे आयोगाने तीव‘ नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या संसर्गामुळे आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने देशमुखांना बाहेर सोडण्यास मनाई केली, दुसरीकडे तळोजा कारागृहातून karagrah सचिन वाझे नियमित चौकशीला हजर राहत आहे. आमचा आदेश आर्थर रोड तुरुंग karagrah प्रशासन मानत नाही का, असा सवाल चांदीवाल आयोगाने उपस्थित केला.
 
 
Anil des
 
ऑर्थर रोड कारागृहातkaragrah  क्षमतेपेक्षा दुप्पट संख्येने कैदी आहेत. कोरोनामुळे सध्या कारागृहातील कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे, शिवाय कारागृहाच्या karagrah आत कोरोना नियम पाळणे अवघड होत असल्याने, बाहेर कैदी गेले नाही तरच योग्य राहील, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. कोरोनाचा धोका पाहता आभासी सुनावणी घ्यावी, अशी विनंती कारागृह प्रशासनाने आयोगाला केली होती. आश्चर्य म्हणजे, चांदीवाल आयोग हा न्यायालयीन चौकशी आयोग असला तरी, या आयोगात आभासी सुनावणीची सुविधा नाही. यामुळे आरोपी तसेच वकील आणि इतर कर्मचार्‍यांना सुनावणीत व्यक्तिगत हजर राहणे भाग पडते. यामुळे आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याशिवाय चौकशीला हजर राहता येणार नाही, असा आदेश आयोगाने दिला होता.