भाजपाकडे 117 जागांसाठी 4,028 इच्छुकांचे अर्ज

    दिनांक :14-Jan-2022
|
चंदीगड, 
पंजाब विधानसभा निवडणुकीतील punjab assembly elections उमेदवारीसाठी अनेकांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली असून, आतापर्यंत 4,028 इच्छुकांनी अर्ज सादर केल्याची माहिती आहे. राज्यात 14 फेब्रुवारी रोजी 117 जागांसाठी एका टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. सूत्रांनुसार, निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 4,028 इच्छुकांनी प्रदेश भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. यात सर्वांनी स्वत: प्रबळ उमेदवार असल्याचा प्रयत्न चालवला आहे.
 
 
punjab elections
 
punjab assembly elections दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेसकडे केवळ 1,620 लोकांनी अर्ज सादर केल्याची माहिती आहे. या दोन्ही प्रमुख पक्षाकडे आलेली आकडेवारी पाहता भाजपाचा आकडा ‘उम्मीद से काफी ज्यादा’ असल्याची भावना व्यक्त होत आहे. इतक्या संख्येत उमेदवारी अर्ज पोहोचल्याने पक्ष नेतृत्वही विचारात पडले आहे. कारण, पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनामुळे ही स्थिती समोर येईल, अशी कुणालाही कल्पना नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, जालंधर, लुधियाना, अमृतसर, पटियाळा, होशियारपूर, पठाणकोट आणि मोहाली या भागातून अर्जांची संख्या अधिक आहे.
 
 
23.8 कोटी मूल्यांच्या वस्तू जप्त
पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक punjab assembly elections कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आदर्श आचार संहिता काळात 12 जानेवारीपर्यंत 23.8 कोटी रुपये मूल्यांच्या वस्तू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. करुणा राजू यांच्यानुसार, मागील लोकसभा, विधानसभा निवडणूक काळातील अनुभव पाहता रोख रक्कम, भेटवस्तू, दारू आदींचे आमिष आदी प्रकारांमुळे विविध भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या काळात 17 अवैध शस्त्रेही पकडण्यात आल्याचे त्यां सांगितले.