सूर्यनमस्कार कार्यक्रमात 75 लाख लोकांचा सहभाग

    दिनांक :14-Jan-2022
|
नवी दिल्ली,
surya namaskar : स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मकर संक्रांतिचे औचित्य साधत आज शुक्रवारी सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 75 लाख लोकांनी सहभाग घेतला आहे. आयुष मंत्रालयाकडून विविध देशांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता. आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीही सकाळी सूर्यनमस्कार surya namaskar घातला. या कार्यक्रमात प्रामुख्याने भारतीय योग संघ, राष्ट्रीय योग क्रीडा संघ, योग प्रमाणन बोर्ड, फिट इंडिया या संस्थांचा समावेश होता.
 
 
Surya namaskar
 
स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आणि मकर संक्रांतिचे औचित्य साधत देशभरात एक कोटी लोक सूर्य नमस्कार surya namaskar करणार असून, जवळपास 75 लाख लोक यात सहभागी होतील, असा अंदाज सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. कोरोनाच्या वाढत्या काळात लोकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.