दहशतवादीविरोधी अभियानात सैनिकांसमोर असलेली आव्हाने

    दिनांक :02-Jan-2022
|
राष्ट्ररक्षा
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
Nagaland नागालँडमधून अफ्स्पा मागे घेण्याबाबत पाच सदस्यीय समिती नियुक्त केल्याची माहिती नागालँडचे Nagaland मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी रविवारी दिली. हा जर कायदा काढला तर तिथे सैनिक राहणार नाहीत. तसे झाले तर नागालँडचे पोलिस जनतेचे रक्षण करण्याकरिता सक्षम आहेत का? आज नागालँडमध्ये Nagaland मुख्य आव्हान आहे, अफू, गांजा, चरस, तस्करी, बेकायदेशीर व्यापार आणि दहशतवादी गट; जे तिथल्या जनतेकडून खंडणी वसूल करतात. अफ्स्पा मागे घेतल्यामुळे तस्करी, खंडणीराज्य थांबणार आहे का? दहशतवादीविरोधी अभियान करणार्‍या सैनिकांसमोर आव्हान असते की, कुठली गाडी थांबवावी, कुठली सोडावी, केव्हा फायर खोलावा किंवा केव्हा फायर करू नये? आपल्यावर जर दगड, तलवारी, चाकूने हल्ला केला तर फायर करावा की नाही? आपल्या साथीदारांना आपण मरताना बघत आहो, त्या वेळेला आपण किती फायर उघडावा?
 

nagaland1 
 
युद्ध कसे लढावे याविषयी न विचारलेला सल्ला
आजूबाजूला असलेले सामान्य नागरिक फायरमध्ये जखमी होऊ नये, म्हणून काही वेळा दहशतवाद्यांना सोडावे लागते, जसे पूंछमधल्या ऑपरेशनमध्ये झाले. मात्र, तसे झाले की, अनेक तथाकथित तज्ज्ञ सैन्याला आपले काम येत नाही; त्यांनी काय करावे, यावर ती लेख लिहितात, टीव्ही चॅनलवर लगेच चर्चा सुरू होतात की कुठली sop पाळली नाही. लढाईमध्ये कुठलेही नियम पाळता येत नाही. रोजचे येणारे प्रसंग अतिशय वेगळे असतात. एखादी निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती, यामध्ये अडकलेले सैनिक यांनी नेमके काय करावे हे सांगणे सोपे नसते.
 
 
सैनिकांना वाचविण्याकरिता आपण जर एखाद्या दहशतवादी समर्थकाला गाडीवर बांधले, तरी तथाकथित मानव अधिकार संस्था आपल्यावर आरोप करू लागतात. मानवाधिकार संस्था, जे स्वतः युद्धात भाग घेत नाही; मात्र युद्ध कसे लढावे, याविषयी वेळोवेळी आपल्याला न विचारलेला सल्ला देत असतात. सिव्हिलियन Civilian गाडीतून येणारे सिव्हिलियन कपड्यांमध्ये असलेले दहशतवादी कसे ओळखायचे? त्यांनी जर शस्त्रं लपवली असतील, शस्त्रे, दारूगोळा हा बरोबर येणार्‍या महिलांच्या सामानात लपवला असेल तर त्यांना कसे शोधायचे? सिव्हिलियनच्या मधून दहशतवाद्यांनी फायर केला तर गर्दीमधला दहशतवादी नेमका कसा ओळखायचा? नागा दहशतवादी गट हे त्या भागात राहणार्‍या नागरिकांमध्ये मिसळून काम करतात. अशा वेळेस गाडीमध्ये येणारे हे दहशतवादी आहेत की सामान्य नागरिक, असे प्रश्न उभे राहतात.
 
 
4 डिसेंबरला 21 स्पेशल फोर्सला कुठल्या परिस्थितीला सामोरे जावे लागले
जर तुमच्यावर कुकरी किंवा दाहनी (तलवारीचे नाव ) हल्ला केला तर त्याला जबाब कसा द्यायचा? जर जमावाने सैनिकांच्या लहान तुकडीला चारी बाजूने घेरले असेल तर तिथून कसे सुटायचे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे 4 डिसेंबरला 21 स्पेशल फोर्सच्या जवानांना नागालँडमध्ये Nagaland द्यावी लागली.
 
 
गुप्तहेर माहिती मिळाली होती की, एन. एस. सी. एन. (के) गट एका गाडीमधून नागालँडमध्ये Nagaland प्रवेश करणार होता आणि त्यांच्याकडे रायफल म्हणजे हत्यारे असतील. खरोखरच गाडीमधल्या एकाकडे शिकार करायची बंदूक होती. एम. एस. सी. एन. (के) ने 4 जून 2015 ला 20 सैनिकांना मारले होते. या दहशतवाद्यांशी सामना करण्याकरिता तिथे 21 स्पेशल फॉर्सची एक छोटी तुकडी small team) म्हणजे 20 ते 21 सैनिक आणि एक ऑफिसर होते.
पुढच्या सैनिकांनी बातमी दिली की, या गाडीमध्ये बसलेल्या लोकांकडे हत्यारे आहेत.
 
‘‘तुम्हाला शस्त्र दिसते आहे का?’’
‘‘हो, नक्कीच शस्त्र दिसत आहे?’’
‘‘किती शस्त्र नेमकी आहेत?’’
‘‘चार ते पाच तरी आहेत.’’
‘‘ठीक आहे. मग त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा?’’
या आदेशाप्रमाणे त्या सैनिकाने गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो स्वतः उघड्यामध्ये होता आणि त्याचा कुठल्याही क्षणी मृत्यू झाला असता. वॉर्निंग देऊनसुद्धा गाडी थांबली नाही. त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सैनिकांना फायर उघडावा लागला? ज्यामध्ये सहा जण मारले गेले. दोन जखमी झाले. ती गाडी का थांबली नाही. कारण अर्थातच त्यामधली माणसे संशयास्पद होती. काही दहशतवादी Terrorist यामध्ये मिसळलेले होते.
 
 
दहशतवादी सर्व काळ दहशतवादी Terrorist नसतात. दहशतवादी कृत्य करून नंतर ते सामान्य माणसांमध्ये मिसळून आपले रोजचे जीवन जगतात. त्यामुळे अशा दहशतवाद्यांना इतर नागरिकांपासून शोधणे अतिशय कठीण असते. 21 स्पेशल फोर्स तिथे पोलिसांनी यायची वाट पाहत होती, परंतु पोलिस तिथे आले नाहीत. त्यांच्याऐवजी शंभराहून जास्त हिंसक नागरिकांचा एक मोठा गट तिथे येऊन पोहोचला. सगळ्यांच्या हातात छोट्या तलवारी म्हणजे दाह होत्या. ते कुठल्याही संवादाला तयार नव्हते. तिथे फक्त सात सैनिक होते.
 
 
याविषयीचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. जिथे सैनिक पुन:पुन्हा या जमावाला मागे जाण्यास सांगत आहे, परंतु जमाव ऐकत नव्हता. त्यांनी एका सैनिकाची मान कापली आणि तेच इतर सैनिकांबाबत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथे असलेल्या सात सैनिकांना आत्मसंरक्षण करण्याकरिता फायर करण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नव्हता. झालेल्या फायरिंगनंतर हातात तलवारी घेऊन हिंसाचार करणारे 6 नागरिक(?) मारले गेले.
 
 
हिंसक जमावाला समजावणे सोपे नसते. ज्या जमावामध्ये काही दहशतवादी घुसलेले असतात, त्यांना समजावणे अतिशय कठीण असते. कारण ते दहशतवादी याच जाती-जमातीचे असतात. जमावाचा उद्देश होता की, सैनिकांना मारणे! म्हणून त्यांनी त्यांना चारी बाजूने घेरले होते. सैनिकांना मारण्याचे नियोजन अतिशय पद्धतशीरपणे तयार केले होते. अर्थातच यामध्ये दहशतवादी गटाचा मोठा हात होता. गाडीमध्ये बसून पळून जाता येऊ नये म्हणून एक बुलडोझर मध्ये उभा करण्यात आला होता; ज्यामुळे या सैनिकांना इतर सैनिकांची मदत मिळणे अशक्य होते. जमावाने सैनिकांनी शस्त्रे खाली टाकावी, अशी मागणी केली; जे करणे अशक्य होते. जमावातून एके-47 रायफलच्यासुद्धा फायरिंग झाले. सैनिकांना 12 bore मधून झालेले फायरिंग आणि एके-47 ची फायरिंग यामधला फरक नक्कीच कळतो. सैनिकांना तिथून स्वतःचा बचाव करून परत जाण्यामध्ये केवढ्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले असेल, याची आपण कल्पना करू शकता.
 
 
नियोजन करून, अत्यंत क्रूरपणे दहशतवाद्यांनी केलेले ऑपरेशन
ज्या जमावाने सैनिकांवर soldiers हल्ला केला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ज्या जमावाने 23 वर्षाच्या सैनिक गौतमची मान कापली त्यांनासुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. हा जमाव साध्या नागरिकांचा नव्हता; यामध्ये दहशतवादी घुसलेले होते. या नागरिकांना सैनिकांनी soldiersशस्त्रे टाकून द्यावी, असे म्हणण्याचा कुठलाही अधिकार नव्हता आणि हे नागरिक नक्कीच नि:शस्त्र नव्हते. सगळ्यांकडे छोट्या तलवारी होत्या. दहशतवादी उंच भागावर लपून बसून या सैनिकांवरसुद्धा फायर करीत होते. सामान्य नागरिकांचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे केलेले हे ऑपरेशन होते. मात्र, नागालँडमधले Nagaland राजकीय पक्ष, अनेक संस्था, तिथले तथाकथित विद्वान हे काहीही समजण्याकरिता तयार नसतात. नागालँड Nagaland पोलिसांनी जमावाच्या दबावाखाली येऊन सैनिकांवरच खटला दाखल केला आहे. मात्र, ज्या जमावाने सैनिकांना मारले, त्यांच्याविषयी काहीच बोलण्यात आले नाही. आता राजकीय पक्ष अशी मागणी करीत आहे की, आर्म्ड फॉर्सेस स्पेशल कायदा काढून टाकला पाहिजे. केंद्र सरकारने एक एक्सपर्ट कमिटी तयार केली आहे; ज्यांना अभ्यास करून आपला रिपोर्ट देण्याकरिता सांगण्यात आले आहे. आशा करूया की, या एक्सपर्ट कमिटीसमोर या सगळ्या बाबी मांडल्या जातील. हा जर कायदा काढला तर नुकसान सर्वात जास्त नागा सर्वसामान्य जनतेचे होईल.
जे राष्ट्र आपल्या सैनिकांचे रक्षण करू शकत नाही त्यांना अत्यंत धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते.
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
••- 9096701253