पंजाबमध्ये भाजपाकडून 61 जागांवर उमेदवार

    27-Jan-2022
Total Views |
चंदीगड, 
पंजाब भाजपाने BJP विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली असून, यात 27 उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने आतापर्यंत एकूण 61 जागांवर उमेदवार उतरवले आहे. भाजपाने काँग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा यांचे बंधू फतेहसिंग बाजवा यांना बटाला मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. फगवाडा येथून विजय सांपला, तर मजिठा येथून प्रदीपसिंह भुल्लर यांना संधी देण्यात आली. भाजपाने पंजाबमध्ये आतापर्यंत 61 जागांवर उमेदवार घोषित असून, पहिल्या यादीत 34 उमेदवारांचा समावेश होता. राज्यात भाजपाने BJP अमरिंदरसिंह यांच्या पंजाब लोक काँग्रेससोबत आघाडी केली आहे. यात भाजपाने 65 जागांवर उमेदवार उभे केले असून, अमरिंदरसिंह यांच्या वाट्याला 37 जागा आल्या आहेत. सुखदेवसिंह ढिंढसा यांच्या अकाली दल (संयुक्त) पक्षाला 15 जागा देण्यात आल्या.
 
 
bjp
 
बिक्रमसिंग मजिठिया यांना 31 जानेवारीपर्यंत अटक नाही
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण तापले असतानाच शिरोमणी अकाली दल नेते तसेच माजी मंत्री बिक‘मसिंग मजिठिया अडचणीत आले आहेत. अमलीपदार्थसंबंधी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 31 जानेवारीपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिला आहे. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने मजिठिया यांना अगि‘म जामीन नाकारला होता. यानंतर अटकेची टांगती तलवार असल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, येत्या 31 जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या न्या. लिझा गिल यांनी म्हटले होते की, याचिकाकर्त्यावर गंभीर आरोप असल्याने त्याला जामीन देता येणार नाही. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत जामीन नाकारकला होता.