सलग दुसर्‍या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प होणार पेपरलेस

27 Jan 2022 21:42:00
- कोरोनामुळे सरकारचा निर्णय
 
नवी दिल्ली,
यंदा सलग दुसर्‍या वर्षी, वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प Budget यावर्षी पेपरलेस होणार आहे. कोरोनामुळे कामाच्या ताणामुळे तसेच सुरक्षिततेच्या कारणांमुळे सरकारने बजेटच्या प्रती छापणे टाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बजेट डिजिटल स्वरूपात उपलब्ध करवून दिले जाईल आणि फक्त काही हार्ड कॉपी छापल्या जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
 
 
Budget
 
अर्थसंकल्प Budget सादर होईपर्यंत 100हून अधिक लोकांना साधारणपणे पंधरा दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात (ज्यामध्ये वित्त मंत्रालय आहे) प्रिंटिंग प्रेसमध्ये राहावे लागते. सध्या कोरोनाचे संक‘मण होण्याची भीती आहे, त्यामुळे अर्थसंकल्प न छापण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतंत्र भारतात प्रथमच, गेल्या वर्षी सरकारला अर्थसंकल्प छापण्याची ही प्रथा थांबवावी लागली. प्रिंटिंग प्रेसमध्ये जागा कमी असते आणि कामासाठी 100 पेक्षा जास्त लोक लागतात, त्यामुळे सुरक्षित अंतर राखणे कठीण असते.
 
 
म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् जेव्हा अर्थसंकल्प Budget मांडतील. त्या दिवशी संसदेच्या परिसरात या वेळी बजेट पेपरने भरलेले ट्रक दिसणार नाहीत. यापूर्वी सरकारने 2016-17 मध्ये अर्थसंकल्पाच्या हार्ड कॉपीची छपाई कमी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु गेल्या वर्षी प्रथमच छपाई पूर्णपणे थांबवली. सरकारने सुरुवातीला पत्रकार आणि विश्लेषकांना वितरित केलेल्या प्रतींची सं‘या कमी केली होती आणि नंतर खासदारांना उपलब्ध केलेल्या प्रती कमी केल्या होत्या. त्यामुळे यंदा सलग दुसर्‍या वर्षी बजेट पेपरलेस सादर केले जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0