डॅनियल कॉलिन्स-बार्टी अंतिम फेरीत

27 Jan 2022 20:40:05
मेलबर्न, 
Daniel Collins  : अमेरिकेच्या डॅनियल कॉलिन्सने Daniel Collins पोलंडच्या इगा स्वियातेकवर 6-4, 6-1 अशी मात करून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता स्वियातेकला विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्रथम विश्वमानांकित अ‍ॅश्लेघ बार्टीविरुद्ध निर्णायक झुंज द्यावी लागणार आहे. बार्टी ही विजेतेपदाची प्रबळ दावेदार असून या स्पर्धेचे विजेतेपद तिनेच जिंकावे, असे ऑस्ट्रेलियाच्या टेनिसप्रेमींना मनोमन वाटते.
 
 
DANIELLE-COLLINS
 
तत्पूर्वी, अ‍ॅश्लेघ बार्टीने अवघ्या 62 मिनिटात अमेरिकेच्या मेडिसन कीजचा 6-1, 6-3 असा सरळ पराभव करून अंतिम फेरी गाठली. 1980 सालानंतर बार्टी ही ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठणारी ऑस्ट्रेलियाची पहिली खेळाडू ठरली. 1980 साली वेंडी टर्नबुलने अंतिम फेरी गाठली होती. आता शनिवारी बार्टी 1978 सालानंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी पहिली टेनिसपटू होऊ इच्छित आहे. 1978 साली ख्रिस ओ’नीलने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती, तेव्हापासून ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही महिला टेनिसपटूला विजेतेपद पटकावता आलेले नाही. 30 व्या मानांकित कॉलिन्सने माजी फ्रेंच ओपन विजेती स्वियातेकविरुद्ध प्रभावी खेळाचे प्रदर्शन करीत वर्चस्व गाजविले. तिने स्वियातेकला सामन्यातून डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.
Powered By Sangraha 9.0