कोरोनामुक्त व बाधितांमध्येही घट

- मात्र, 14 मृत्यू

    27-Jan-2022
Total Views |
नागपूर,  
मागील 24 तासात कोरोनामुक्तांमध्ये वाढ तसेच रोजच्या बाधितांमध्ये सव्वा हजाराहून अधिक घट दिलासादायक ठरली असली तरी 14 मृत्यू चिंता वाढवणारे ठरले आहेत.
  
corona
 
 
मागील 24 तासात बाधितांची सं‘या 5 लाख 50 हजार 160वर पोहोचली. आरटीपीसीआर पद्धतीने 6764, रॅपिड अँटिजेन पद्धतीने 915, अशा एकूण 7679 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात सर्वाधिक खाजगी प्रयोगशाळांमध्ये 1745, मेयो रुग्णालयात 386, मेडिकल रुग्णालयात 172, एम्समध्ये 454, नीरी 66, अँटिजन पद्धतीने 48, असे एकूण 2871 नमुने सकारात्मक आले. मंगळवारी 4225 बाधित होते.
 
 
 
मागील 24 तासात बरे होणार्‍यांची 4373 सं‘या व 92.98 टक्के हे प्रमाण कोरोनाच्या गंभीर सावटात दिलासा देणारे ठरले आहे. नागपुरात 3118, ग्रामीणचे 1153, जिल्ह्याबाहेरील 102 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत 5 लाख 11 हजार 555 कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात गृहविलगिकरणातील 2 लाख 13 हजार 325 रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी 3453 कोरोनामुक्त झाले. त्यापेक्षा कोरोनामुक्तांची सं‘या वाढली.
 
 
 
मात्र, मागील 24 तासात नागपुरातील 10 तसेच जिल्ह्याबाहेरील 4, अशा 14 बाधितांचा मृत्यू झाला. मंगळवारी शहरातील 5 व जिल्ह्याबाहेरील 1, असे 6 मृत्यू होते. 24 तासात अडीच पट वाढ चिंता वाढवणारी ठरली आहे. आतापर्यंत ग‘ामीणमध्ये 2608, शहरात 5955, जिल्ह्याबाहेरील 1640, असे एकूण 10203 बाधितांच्या मृत्यूची संख्या झाली आहे. रुग्णालयात 4020 उपचार घेत असून 24382 गृहविलगिकरणात आहेत.