पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते पारितोषिकांचे वितरण

    27-Jan-2022
Total Views |
बुलडाणा,  
Guardian Minister  जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडून पोलीस प्रशिक्षण केंद्रात उल्लेखनिय सेवा दिल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट पोलीस पदक 2020 सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुरेश नाथाजी इंगळे यांना प्रदान करण्यात आले. जिल्हा क्रीडा व युवा पुस्कार 2020-21 अंतर्गत स्वामी सुधाकर दळवी यास पुरूष गटातील जिल्हा क्रीडा पुरस्कार, कु.मोनाली चंद्रहर्ष जाधव हिस महिला गटातील जिल्हा क्रीडा पुरस्कार, मिहीर नितीन अपार यास जिल्हा क्रीडा विशेष पुरस्कार व विजय भाऊराव पळसकर, मलकापूर यांना जिल्हा क्रीडा विशेष गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा सामान्य रूग्णालय, चोपडे हॉस्पीटल बुलडाणा, अमृत हृदयालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल बुलडाणा, संचेती हृदयालय व सामान्य रूग्णालय खामगांव यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
 
Guardian Minister