मुंबईत नितीन राऊत पक्षाच्या बैठकीतून परतले

27 Jan 2022 22:16:15
- नाराजीची चर्चा जोरात
 
मुंबई, 
EM Nitin Raut : काँग्रेसने आयोजित केलेल्या महत्त्वाच्या बैठकीतून ऊर्जामंत्री नितीन राऊत परत EM Nitin Raut  गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या नाराजीची चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदार रंगली असून, यातून आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुढे आल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य काही नेते उपस्थित होते. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या या बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत नाराज होऊन बैठकीत उपस्थित न राहता माघारी परतल्याचे वृत्त आहे. नितीन राऊत यांना या बैठकीच्या संदर्भात कळवण्यात आले नव्हते आणि त्यामुळे त्यांनी एमसीएच्या दरवाजासमोरून माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
 
 
em nitin
 
मंत्री नितीन राऊतांच्या EM Nitin Raut  नाराजीचे काहीच कारण नाही. ही बैठक काँग्रेसच्या ठरावीक नेत्यांपुरतीच होती. पार पडलेल्या निवडणुका आणि आगामी निवडणुका याबाबत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही काँग्रेस म्हणूनच लढणार आणि पक्ष एक नंबरला आणणार, असे प्रवक्तेअतुल लोंढे यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानुसार, आजची बैठक ही आगामी निवडणुका आणि गेल्या निवडणुकीचा निकाल यावर पार पडली. राऊत यांचे बैठकीला येणे अपेक्षित नव्हते. ते प्रभारी पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. तर, अन्य नेते तसेच मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राऊत यांचे माझ्याशी बोलणे झाले. नितीन राऊतांच्या ऊर्जा खात्याचा विषय सरकार सर्वांशी निगडीत आहे.
आपण नाराज नाही
एच. के. पाटील यांच्या सदिच्छा भेटीसाठी गेलो होतो. त्यानंतर आपल्या नियोजित बैठकीतील उपस्थितीसाठी मंत्रालयात आलो. यात नाराज होण्याचे काय, असा प्रश्न उपस्थित करत अशा बातम्या खोळसाळपणाच्या आहेत, अशी प्रतिक्रिया देत नितीन राऊत EM Nitin Raut  यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0