मानधन थकले, जगायचे कसे?

27 Jan 2022 21:20:12
तभा वृत्तसेवा  
गोंदिया,  
Anganwadi workers जानेवारी संपत आला, तरी मागील महिन्याचे मानधन अद्याप न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचार्‍यांचा धीर खचला आहे. हातात पैसे नसल्याने चूल पेटवायची कशी? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. जिल्ह्यात 1570 अंगणवाडी व 243 मिनी अंगणवाडीतील कर्मचार्‍यांचे लाखो रुपयांचे मानधन प्रलंबित आहे. त्यामुळे संतप्त आंगणवाडी कर्मचार्‍यांनी धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. 
 
Anganwadi workers
 
 
ग्रामीण बालकांचे शैक्षणिक, आरोग्याचे धोरण ठरविण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्यांनी वर्षभरात लहान मुलांच्या बारीकसारीक हालचाली, बौद्धिक क्षमतेची ठेवलेल्या नोंदीच्या आधारेच राज्याचा महिला व बालकल्याण, भागातील लहान तसेच शिक्षण विभाग मुलांच्या बाबतीत राज्याचे धोरण ठरवतो. शासनाची इतकी मोठी जबाबदारी पार पाडणारा अंगणवाडी कर्मचारी हा घटक वारंवार दुर्लक्षित राहिला आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास प्रशासनाचा हा वर्ग लक्ष असतो. बजेट नसल्याचे कारण पुढे करत त्यांना मिळणार्‍या तुटपुंज्या मानधनाचे तुकडे पाडले जातात. वर्षानुवर्षे हीच परंपराच चालत आली आहे. अंगणवाडी कर्मचारी म्हणून काम करणारे हे समाजातील उपेक्षित घटकांतील आहेत.
 
 
 
गरीब, दीनदलित, परित्यक्ता महिलांनी नाईलाजास्तव हा सेवाधर्म स्वीकारला आहे. कामाच्या बदल्यात सेविकेला 8 हजार, तर मदतनीसला पावणेपाच हजार रुपये एकत्रित मानधन दिले जाते. या व्यतिरिक्त कोणताही भत्ता, सवलती दिल्या जात नाहीत. मिळत असलेल्या तुंटपुंज्या मानधानात त्यांची उपजीविका सुरू आहे. पण अलीकडच्या काळात तेही वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. डिसेंबरचे मानधन 1 जानेवारीला जमा होणे आवश्यक होते. परंतु अघापही मानधन मिळालेले नाही. बजेटची तरतूद नसली तरी त्यांचे मानधन थांबवायचे नाही, असा शासन निर्णय आहे, परंतु त्याकडेही प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करते. मानधन मिळाले तरच बहुतांश कर्मचार्‍यांची चूल पेटते, हे वास्तव असताना शासन आमच्याकडेच का दुर्लक्ष करते? असा संतप्त प्रश्न कर्मचार्‍यांतून व्यक्त केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0