जुगराज, अभिषेकचे प्रो-लीग हॉकीत पदार्पण

    27-Jan-2022
Total Views |
- भारताचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे

नवी दिल्ली, 
Jugraj, Abhishek : आगामी 8 ते 13 फेब्रुवारीदरम्यान दक्षिण आफ्रिका व फ्रान्सविरुद्ध होणार्‍या दुहेरी एफआयएच प्रो-लीग हॉकीसाठी हॉकी इंडियाने 20 सदस्यीय मजबूत भारतीय हॉकी संघ जाहीर केला आहे. युवा ड्रॅगफ्लिकर जुगराज सिंग व आक‘मक खेळाडू अभिषेक Jugraj, Abhishek या दोन नवीन चेहर्‍यांचा संघात समावेश केला असून ते एफआयएच प्रो-लीगमध्ये पदार्पण करणार आहेत. भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा मध्य फळीचा स्टार खेळाडू व टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंग सांभाळणार आहे. मनप्रीतला ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंग उपकर्णधार म्हणून सहकार्य करेल.
 
 
Abhishek
 
अटारीच्या जुगराजने Jugraj पहिल्याच हॉकी इंडिया सीनियर पुरुष आंतर विभागीय राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीने राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले. व त्याची पहिल्यांदाच वरिष्ठ गट राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. तसेच अभिषेक हा आक्रमक खेळाडू असून तो पूर्वी राष्ट्रीय कनिष्ठ गट संघाचा सदस्य भाग होता. तो 2017 व 2018 मध्ये सुलतान ऑफ जोहोर चषक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ संघाकडून खेळला होता. सोनीपत, हरयाणाच्या अभिषेकने पहिल्या वरिष्ठ पुरुष आंतर विभागीय राष्ट्रीय स्पर्धेतही पंजाब नॅशनल बँकेसाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्याला प्रथमच वरिष्ठ राष्ट्रीय शिबिरात स्थान मिळण्यास मदत झाली.
 
 
20 सदस्यीय संघात गोलरक्षक पी.आर. श्रीजेश व कृष्ण बहादूर पाठकचाही समावेश आहे. बचावपटू हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जर्मनप्रीत सिंग व जुगराजचा Jugraj संघात समावेश करण्यात आला आहे. मनप्रीतच्या देखरेखीखाली असलेल्या मध्य फळीत नीलकांत शर्मा, हार्दिक सिंग, जसकरण सिंग, समशेर सिंग व विवेक सागर प्रसादचाही समावेश आहे. आक‘मक फळीत मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, आकाशदीप सिंग, शिलानंद लाकरा, दिलप्रीत सिंग व अभिषेकचा समावेश आहे.
 
 
बंगळुरूमध्ये तीन आठवड्यांच्या शिबिरानंतर 14 टोकियो ऑलिम्पिकपटू व प्रो-लीग हॉकीत पदार्पण करणार्‍या खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे, असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी म्हटले आहे. भारतीय संघ 4 फेब्रुवारी रोजी बंगळुरूहून दक्षिण आफि‘केला रवाना होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 फेब्रुवारी रोजी फ्रान्सविरुद्ध खेळला जाईल व दुसर्‍या दिवशी यजमान दक्षिण आफि‘केशी सामना होईल. भारतीय संघ 12 फेब्रुवारी रोजी पुन्हा फ्रान्सशी सामना खेळतील व त्यानंतर दुसर्‍या दिवशी दक्षिण आफि‘केविरुद्ध खेळतील. दोन्ही दोन सामने दक्षिण आफि‘केतील पॉचेफस्ट्रुम येथे होणार आहेत.
 
 
भारतीय हॉकी संघ: गोलरक्षक: पी. आर. श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक. बचावपटू : हरमनप्रीत सिंग (उपकर्णधार), अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग.मध्य फळी : मनप्रीत सिंग (कर्णधार), नीलकांत शर्मा, हार्दिक सिंग, जसकरण सिंग, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद. आक‘मक फळी : मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, आकाशदीप सिंग, शिलानंद लाक‘ा, दिलप्रीत सिंग, अभिषेक. राखीव : सूरज करकेरा, मनदीप मोर, राज कुमार पाल, सुमित, गुरसाहिबजीत सिंग.