मालविका बन्सोड उपांत्यपूर्व फेरीत

    27-Jan-2022
Total Views |
- ओडिशा ओपन बॅडमिंटन
- तस्नीम मीरवर मात
 
कटक,
Malvika Bansod : आपला चांगला फॉर्म कायम ठेवित भारताची युवा बॅडमिंटनपटू मालविका बनसोड Malvika Bansod हिने गुरुवारी येथे ओडिशा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपलीच संघमैत्रीण व कनिष्ठ गटाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या तस्नीम मीरचा सरळ गेममध्ये पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बीडब्ल्यूएफ सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत मालविकाने 16 वर्षीय तस्नीमवर अर्ध्या तासात 21-13, 21-15 असा विजय नोंदविला.
 

MALVOKA-BANSOD 
 
या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या इंडिया ओपनमध्ये 20 वर्षीय मालविकाने Malvika Bansod सायना नेहवालवर खळबळजनक विजय नोंदविला, तर गत आठवड्यात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिला पी. व्ही. सिंधूकडून पराभव पत्करावा लागला होता. आता उपांत्यपूर्व फेरीत मालविकाचा Malvika Bansod सामना तान्या हेमंत व विजेता हरीशदरम्यानच्या सामन्यातील विजयी खेळाडूशी होईल. पाचव्या मानांकित अस्मिता चालिहानेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून तिने संघमैत्रीण अनुपमा उपाध्यायचा 21-17, 21-16 असा पराभव केला. आता तिची गाठ ऋचा सावंतशी पडेल. ऋचाने निक्की राप्रियाचा पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे.
 
 
पुरुष एकेरीत तिसर्‍या मानांकित शुभंकर डेने बुधवारी सहाव्या मानांकित कॅनडाच्या झियाओडोंग शेंगला हरविल्यानंतर त्याने पुढल्या फेरीत भारताच्या राहुल यादव चित्ताबोईनाचा 33 मिनिटांत 21-16, 21-14 असा पराभव केला. किरण जॉर्जनेही दुसर्‍या फेरीच्या सामन्यात चिराग सेनवर 21-12, 21-13 असा सहज विजय मिळवित पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत धृव रावत व शिखा गौतम या भारतीय जोडीला दुसर्‍या फेरीत सचिन डायस व थिलिनी हेंडाहेवा या श्रीलंकेच्या जोडीकडून 11-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला, तर आयुष माखिजा व दीक्षा चौधरी या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना चिराग अरोरा-निश राप्रिया या जोडीचा 21-5 21-16 असा पराभव केला.