मौनी रॉयला लागली हळद

27 Jan 2022 10:01:23
मुंबई,
Mauni Roy बॉलीवूडमध्ये सध्या वेडिंग सीझन सुरू आहे. आता याच यादीत नागिन फेम अभिनेत्री 'मौनी रॉय'चा सुद्धा नंबर लागला आहे. गोव्यात मौनी रॉय आणि बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडणार असून आता या दोघांकडे लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतेच मौनीच्या हळदी सोहळ्याचे फोटो समोर आले असून अल्पावधीत हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. शेअर झालेल्या या फोटोमध्ये मौनी आणि सूरज या दोघांना हळद लागल्याचं दिसून येत आहे. यावेळी मौनीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे. तर सूरजने पांढऱ्या रंगाची पठाणी घातल्याचं पाहायला मिळत आहे. या ड्रेस मध्ये हे दोघेही अतिशय सुंदर दिसत होते.
 
roy
 
Mauni Roy या शाही विवाह सोहळ्यासाठी गोव्यात मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत मौनीचा लग्न सोहळा रंगणार आहे. मात्र, करोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लवकरच ही जोडी मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, मौनी आणि सूरज आज म्हणजेच, दि. २७ तारखेला कँडोलिम येथे लग्न बंधनात अडकणार आहेत. मौनी रॉयचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियार हा दुबईमध्ये राहणारा बिझनेसमन आणि बँक इन्व्हेस्टर आहे. त्यांचा जन्म बंगळुरू येथे जैन कुटुंबात झाला.
Powered By Sangraha 9.0