उत्तर कोरियाची जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी

    27-Jan-2022
Total Views |
प्योंगयांग, 
Missile test : उत्तर कोरियाने पुन्हा जपानच्या समुद्रात आज गुरुवारी क्षेपणास्त्र चाचणी केली असून, उत्तर कोरियाने या वर्षात घेतलेली ही सहावी क्षेपणास्त्र चाचणी Missile test आहे. उत्तर कोरियावर निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्राकडे आवाहन केले होते, मात्र चीन आणि रशियाने त्याचे प्रयत्न रोखले होते.
 
 
Missile test
 
उत्तर कोरियाने सहा दिवसांपूर्वी क्षेपणास्त्र चाचणीही Missile test केली होती, 5 जानेवारीला हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणी घेतली, अशी माहिती दक्षिण कोरियाने दिली. या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर कोरियाने या वर्षातील पहिली चाचणी 6 जानेवारी रोजी केली आणि त्यानंतर 11 जानेवारी रोजी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. 17 जानेवारी रोजी पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.