राज बब्बर सपामध्ये जाणार?

    27-Jan-2022
Total Views |
लखनौ, 
Raj Babbar : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर होत असतानाच काँग्रेस नेत्यांचे पक्ष सोडण्याचे प्रकारही सुरूच आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर Raj Babbar समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीपासून ते पक्षात सकि‘य नसल्याचे दिसून येते. काँग्रेस नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीमधील माजी मंत्री आर. पी. एन. सिंह यांच्यानंतर माजी खासदार राकेश सचान यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर Raj Babbar हे समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन चांद यांनी समाज माध्यमातील महत्त्वाचे व्यासपीठ असलेल्या ‘कू’वर म्हटले की, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी समाजवादी नेता, अभिनेता लवकरच समाजवादी होतील.
 
 
raaj
 
काँग्रेसच्या सरचिटणीस तसेच राज्य प्रभारी प्रियांका वढेरा यांनी उत्तरप्रदेशची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज बब्बर Raj Babbar निष्कि‘य आहेत. मागील लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. राज बब्बर यांनी आपली राजकीय कारकीर्द जनता दलापासून केली होती. पाच वर्षांनंतर त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. 1994 सपाने त्यांना राज्यसभेत पाठवले. 2004 मध्ये सपाच्या उमेदवारीवर लोकसभेत पोहोचले. अमरसिंह यांच्या वाढत्या पक्षातील हस्तक्षेपामुळे त्यांनी 2006 मध्ये सपातून बाहेर पडत माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्यासोबत जनमोर्चाची स्थापना केली. 2008 मध्ये काँग‘ेसमध्ये केला होता.
 
 
समाजवादी पार्टीकडून 56 उमेदवार जाहीर
समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आणखी एक 56 उमेदवारांची यादी घोषित केली आहे. पक्षाने बुधवारी 39 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता 56 नवे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. लखीमपूरमधील धौरहरा मतदारसंघातून वरुण चौधरी यांना तर, मोहम्मदी मतदारसंघातून दाऊद अहमद यांना उमेदवारी दिली आहे. अमेठीमधील तिलोई मतदारसंघातून नईम गुर्जर, अलाहाबादमधील फुलपूरमधून मुर्तझा सिद्दीकी निवडणूक रिंगणात आहेत. भजपातून आलेले दारासिंह चौहान यांना घोसी मतदारसंघाचे उमेदवार घोषित केले आहे. याशिवाय भाजपातून आलेले रमाकांत यादव यांना फुलपूर पवई मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. बसपातून आलेले रामअचल राजभर यांना अकबरपूर, लालजी वर्मा यांना कटेहरी, तर राकेश पांडे यांना जलालपूर मतदारसंघातून संधी दिली आहे.