भारतीय महिला हॉकी संघला आता कांस्यपदकाची आशा

    27-Jan-2022
Total Views |
मस्कत,
Savita Punia : महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपदाच्या आशा संपल्यानंतर भारतीय महिला संघ आता किमान कांस्यपदक तरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. शुक‘वारी तिसर्‍या-चौथ्या क‘मांकाच्या प्ले-ऑफच्या सामन्यात भारताला चीनविरुद्ध झुंज द्यावी लागणार आहे, तर जपान आणि कोरिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक चौथे स्थान मिळविणार्‍या भारतीय संघाला सामन्यांच्या सरावाचा अभाव महागात पडला.
 
 
savita-punia
 
विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडताना महत्त्वपूर्ण सामन्यांत भारतीय संघाच्या कामगिरीत विसंगता दिसून आली. या स्पर्धेत राणी रामपालच्या जागी सविता पुनिया Savita Punia भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे. भारताने सलामीच्या लढतीत मलेशियाला 9-0 ने पराभूत केल्यानंतर, भारताला आशियाई विजेत्या जपानकडून 0-2 ने पराभव पत्करावा लागला व उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी सिंगापूरला 9-1 ने पराभूत केले. मात्र उपांत्य फेरीत भारताला कोरियाकडून 2-3 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला.