राफेल उडवणार्‍या शिवांगीने केले चित्ररथाचे नेतृत्व

    27-Jan-2022
Total Views |
नवी दिल्ली, 
Shivangi Singh : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनात भारतीय वायुदलाच्या चित्ररथाचा समावेश होता. यामध्ये राफेल उडवणारी देशातील पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह Shivangi Singh देखील सहभागी झाल्या. शिवांगी सिंह यांच्याकडे हवाई दलाच्या चित्ररथाचे नेतृत्व होते.
 
 
Shivangi-Singh
 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशाची राजधानी दिल्लीतील राजपथ येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देशाच्या शक्ती आणि संस्कृतीचे भव्य संचलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी राफेल लढाऊ विमान चालवणार्‍या देशातील पहिली महिला फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह Shivangi Singh यांनी सर्वांचे लक्ष वेधले. जगातील सर्वोत्तम श्रेणीच्या लढाऊ विमानांपैंकी एक असलेल्या ‘राफेल’ची पहिली महिला फायटर पायलट बनण्याचा मान शिवांगी सिंह यांना मिळाला आहे. राफेल वायुसेनेतील ‘मिग 21 बायसन’ची जागा घेताच शिवांगीही Shivangi Singh आपल्या नव्या भूमिकेत दाखल झाल्या आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनात ‘भारतीय वायुसेना, भविष्यासाठी बदल’ असे वायू दलाच्या चित्ररथाचे शीर्षक होते. यावेळी मिग-21, जी-नेट, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि आश्लेषा रडारसह राफेल विमानांचे स्केल डाउन मॉडेल्स देखील या चित्ररथात दाखवण्यात आले.