शेअर बाजार कोसळला

    27-Jan-2022
Total Views |
मुंबई :
Stock market : अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे धोरण येत्या मार्चपासून अधिक कठोर होणार असल्याच्या वृत्तामुळे देशांतर्गत बाजारात बड्या कंपन्यांचे शेर्अ विक्रीच्या दबावाखाली आल्याने शेअर बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजारातील Stock market निर्देशांकात दिवसअखेर 581 अंकांची घसरण होऊन तो 57,277 वर बंद झाला.
 
 
stock market
 
राष्ट्रीय बाजारातील Stock market निफ्टीतही 168 अंकांची घसरण झाली. तो 0.97 टक्क्यानी घसरून 17,110 या पातळीवर बंद झाला. एससीएल टेकचे शेअर्स सर्वाधिक तोट्यात राहिले. त्यापाठोपाठ टेक महिन्द्रा, डॉ रेड्डीज, विप्रो, टीसीएस, टायटन आणि इन्फोसिस यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, मारुती आणि कोटक बँक या कंपन्यांचे शेअर्स या विक्रीच्या दबावातही फायद्यात राहिले.