सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा

    27-Jan-2022
Total Views |
मुंबई,
Sundar Pichai : गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई Sundar Pichai आणि पाच अधिकार्‍यांच्या विरोधात कॉपी राईट प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिल्म निर्माते सुनील दर्शन यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
Sundar Pichai
 
सुनील दर्शन यांनी दावा केला आहे की, गुगलने अनधिकृत व्यक्तींना त्यांचा ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा चित्रपट युट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिली. त्यांच्या चित्रपटाच्या बेकायदेशीर अपलोडद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे कमावले जात आहे. या चित्रपटाचे सर्व अधिकार सुनील यांच्याकडे आहेत आणि त्यांनी ते कोणालाही विकलेले नाहीत. युट्यूबचे लाखो वापरकर्ते या चित्रपटातील कंटेंटचा वापर करीत आहेत आणि लाखो वेळा हा चित्रपट युट्यूबवर पाहिला गेला आहे, यामुळे निर्मात्याचे मोठे नुकसान झाले आहे.