टाटा स्कायचे झाले ‘टाटा प्ले’

27 Jan 2022 21:57:34
नवी दिल्ली,
Tata Play : टाटा स्काय या डायरेक्ट-टू-होम मंचाचे नामांतर झाले असून, टाटा स्काय आता ‘टाटा प्ले’ Tata Play या नावाने सेवा देणार आहे. नामांतरासह कंपनीने आपल्या पॅकेजमध्ये टेलिव्हिजन-कम-ओटीटीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा प्लेने नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारसह 13 ओटीटी मंच आपल्या बिंज सेवेत समाविष्ट केले आहेत.
 
 
Tata Play
 
399 रुपये प्रती महिन्याचा हा कॉम्बो पॅक आज गुरुवारपासून सुरू करण्यात आला असून, राष्ट्रीय स्तरावर या पॅकची जाहिरात अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान हे करणार आहेत. दक्षिणेतील राज्यांमध्ये जाहिरात करण्यासाठी आर. माधवन् आणि प्रियामणी यांची निवड करण्यात आली आहे. बरेच लोक टेलिव्हिजनसोबतच ओटीटी कंटेटदेखील पाहतात. वेगवेगळ्या ओटीटी मंचावर कंटेट शोधणे आणि तो व्यवस्थित करणे कठीण काम आहे, असे कंपनीच्या लक्षात आले आहे, असे टाटा प्लेचे Tata Play मुख्य कार्यकारी अधिकारी हरित नागपाल यांनी सांगितले. याशिवाय, टाटा प्लेने Tata Play आपला 175 रुपयांचा सर्व्हिस व्हिजिट चार्ज काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ज्या डीटीएच ग्राहकांनी त्यांचा पॅक रिचार्ज केला नाही ते देखील विनामूल्य री-कनेक्शन मिळवू शकणार, असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
Powered By Sangraha 9.0