उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून दाखल केली उमेदवारी

27 Jan 2022 19:08:17
पणजी,
Utpal Parrikar : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर Utpal Parrikar यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून आज गुरुवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गोव्यात 14 फेबु‘वारीला 40 जागांसाठी मतदान होत असून, एकाच टप्प्यात होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा उद्या शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. उत्पल यांनी आज उमेदवारी दाखल करण्यापूर्वी महालक्ष्मी मंदिरात पूजा केली. मला पूर्ण विश्वास आहे की पणजीमधील जनता मला आशीर्वाद देतील. माझ्या वडिलांनी येथील लोकांसाठी जे काही काम केले, तोच वारसा मला पुढे न्यायचा आहे, असे उत्पल पर्रिकर Utpal Parrikar यांनी सांगितले.
 
 
PTI01_27_2022_000022B
 
भाजपाकडून पणजीतून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष लढण्याचा निर्णय घोषित केला होता. त्यांची ही बंडखोरी पाहता भाजपाचे सरचिटणीस सी. टी. रवी यांनी त्यांनी पुनर्विचार करावा, असे आवाहन केले होते तसेच दोन ठिकाणांहून लढण्याची संधी देवू केली होती. याशिवाय शिवसेना आणि आम आदमी पार्टीनेही त्यांना आपल्या बाजूने करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. भाजपाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सँकलिम मतदानसंघातून उमेदवारी दिली असून, उपमुख्यमंत्री मनोहर अजगावकर हे मडगावातून उमेदवार आहेत. आम आदमी पार्टीने वकिलीतून राजकारणात आलेले अमित पालेकर यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला आहे. याशिवाय काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत (जीएफपी) आघाडी केली आहे.
Powered By Sangraha 9.0