ज्येष्ठ साहित्यिक श्यामकांत कुळकर्णी यांचे निधन

    27-Jan-2022
Total Views |
नागपूर,  
ज्येष्ठ साहित्यिक, कवी, लेखक, टपाल व दूरसंचार खात्याचे निवृत्त लेखा परीक्षण अधिकारी श्यामकांत विष्णू कुळकर्णी यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात प्रा. दीपक, डॉ. प्रकाश व उज्ज्वल ही तीन मुले व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला. अतिशय स्वच्छ, पारदर्शी, नितळ मनाचे सज्जन आणि मनमिळाऊ अशी त्यांची ‘याती होती. 
 
Shyamkant Kulkarni
 
 
श्यामकांत कुळकर्णी यांचे रामायणातील लक्ष्मण व ऊर्मिला यांच्यावर आधारित ‘सौमित्र’ तसेच शिक्षकाच्या जीवनावर आधारित ‘आधार’ या दोन कादंबर्‍या, ‘काचेचे मनोरे’, ‘पार्टनर’ व ‘ध्यास’ हे तीन कथासंग‘ह, ‘न उधळलेले रंग’, ‘टेलिफोनचा बर्थ डे’ हे दोन ललित लेखसंग‘ह, ‘झरोका’, ‘झंकार’ हे दोन कवितासंग‘ह, गालिबच्या निवडक शेर-शायरींचा मराठी स्वैर अनुवाद ‘गालिबची शायरी’, बालसाहित्यात मदनलाल धिंग्रा (अनुवादित), गोष्टीरूप डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, मुलांचे साने गुरुजी, गाथा थोर क‘ांतिभास्कराची (स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र), गोष्टीरूप महाराणा प्रताप, गोष्टीरूप महात्मा गांधी तसेच जग एक शाळा, जेव्हा झाडे बोलू लागतात हे बालकथासंग‘ह प्रकाशित आहेत.
 
 
 
‘गोष्टीरूप डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा पुरस्कार प्राप्त झाला. ‘साहित्य विहार’, विदर्भ लेखक सहकारी संघाच्या स्थापनेत श्यामकांत कुळकर्णी यांचे योगदान मोठे आहे. वि. सा. संघ, माग‘स, पद्मगंधा प्रतिष्ठान, साहित्य कला सेवा मंडळ, रसिकराज आदी संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध राहिला आहे.