आनंदवार्ता...सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ होणार?

    27-Jan-2022
Total Views |
नवी दिल्ली,
government employees मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना पगार वाढीची भेट देऊ शकते. सरकार कर्मचार्‍यांच्या मूळ पगारात वाढ करू शकते, अशा बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. एका  रिपोर्टनुसार मोदी सरकार (modi government) फिटमेंट फॅक्टर (fitment factor) वाढवण्याचाही विचार करत आहे. फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचे मूळ वेतन ठरवते. मोदी सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन म्हणजेच मूळ वेतन 18000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकते.
 
7 pay
government employees केंद्र सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचे वेतन आपोआप वाढेल. फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्रीय सरकारी कर्मर्‍यांचे मूळ वेतन ठरवतो. फिटमेंट फॅक्टर शेवटचा 2016 मध्ये वाढवण्यात आला होता, ज्यामध्ये कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 6,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले होते. फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढीमुळे 26,000 रुपये किमान मूळ वेतन मिळू शकते. सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये असून ते 26,000 रुपये होणार आहे. एका रिपोर्टनुसार, कर्मचारी संघटना याप्रकरणी सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर किमान पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढल्यास, महागाई भत्ताही वाढेल. महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 31 टक्के इतका आहे. DA ची गणना डीएच्या दराला मूळ वेतनाने गुणाकार करून केली जाते. म्हणजेच मूळ वेतनात वाढ झाल्यास महागाई भत्ता आपोआप वाढतो.