वेस्ट इंडीज संघात एनक्रुमाह बोनरचे पुनरागमन

    27-Jan-2022
Total Views |
सेंट जॉन्स, 
nkrumah bonner : अनुभवी वेगवान गोलंदाज केमार रोच व युवा अष्टपैलू एनक्रुमाह बोनरला nkrumah bonner यांना 6 फेब्रुवारीपासून भारतात सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या वन-डे संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. रोच 2019 मध्ये अखेरचा वन-डे सामना खेळला होता व तेव्हापासून तो एकही लिस्ट ए कि‘केट सामना खेळला नाही. अलिकडे राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे डेसमंड हेन्स यांनी त्याची संघात निवड केली. आयर्लण्डकडून घरच्या मैदानावर पराभूत झालेल्या कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखालील विंडीज संघातील सहा खेळाडू कायम राखण्यात आले आहे.
 
 
nkrumah-bonner
 
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 6, 9 व 11 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध एकदिवसीय सामने खेळविले जाणार आहे. 16, 18 व 20 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर टी-20 सामने खेळले जातील आणि त्यासाठी शुक‘वारी विंडीजचा जाहीर केला जाणार आहे. अनुभवी रोचशिवाय 22 वर्षीय बोनर nkrumah bonner व सलामी फलंदाज ब्रॅण्डन किंगला संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. बोनर हा मधल्या फळीतील फलंदाज असून त्याने एक वर्षापूर्वी अखेरचा वन-डे सामना खेळला होता. 27 वर्षीय किंग 2020 मध्ये अखेरचे वन-डे दौरा केला होता. रोचने आतापर्यंत 92 वन-डे सामने खेळले असून 124 बळी घेतले आहेत. बोनरने nkrumah bonner वर्षभरापूर्वी बांगलादेशमध्ये वन-डे पदार्पण केले व आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, तर किंगने चार सामने खेळले आहे. आम्ही निवडलेला संघ खूप चांगला आहे व 2023 मध्ये भारतात होणार्‍या विश्वचषकाच्या तयारीचा भाग म्हणून आम्ही या दौर्‍याकडे पाहत आहोत, असे डेसमंड हेन्स म्हणाले.
 
 
वेस्ट इंडीज वन-डे संघ असा : कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्रॅव्हो, शमारह ब्रुक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रॅण्डन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श जे.