- वसंतराव नाईक शासकिय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे उभारला प्रकल्प
यवतमाळ,
बायो मेडिकल वेस्ट Bio-medical waste प्रक्रिया प्रकल्प साधारणपणे गावाच्या बाहेर स्थापित केलेले आहेत. मात्र वसंतराव नाईक शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात राज्यातील पहिलाच ऑनसाईड बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प उभारून व्यवस्थितपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, या प्रकल्पात वापरल्या जाणारे तंत्रज्ञान हे थर्मल टेम्परेचर वेस्ट डायरेक्ट डिस्पोजल डायरेक्ट टेक्नॉलॉजीचे असून हा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा व शासकीय महाविद्यालयातील पहिलाच प्रकल्प आहे.
प्रकल्पामध्ये प्रोसेस केल्या जाणार्या बायो मेडेकिल वेस्टमुळे Bio-medical waste कुठल्याही प्रकारचे वायुजल तथा जमिनीचे कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही. या प्रकल्पाची क्षमता दिवसाला 1 टन असुन प्रक्रिया केल्यानंतर केवळ 1 ते 2 किलो राख बाहेर पडते. ही राख ही सिमेंट फॅक्टरीत विटा बनविण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. या प्रकल्पामध्ये विजेचा अत्यंत कमी उपयोग होतो. तसेच हा प्रकल्प स्वयंचलीत असुन याला एक व्यक्ती सहज हाताळू शकतो. हा प्रकल्प सर्जीसोल कंपनीने मेड इन इंडिया अंतर्गत विकसीत केले आहे.
या प्रकल्पासाठी 4.97 कोटी रुपये निधी जिल्हा नियोजनातून पालकमंत्र्यांनी दिले आहे. यापूर्वी रुग्णालयातून बायो मेडिकल वेस्ट Bio-medical waste अमरावती येथील प्रकल्पात पाठविण्यात येत होते. त्यासाठी महिन्याला किमान 8 लाख रुपये खर्च येत होता. वैद्यकीय महाविद्यालयाचे यासाठी होणार्या खर्चात आता बचत होणार आहे. या प्रकल्पात जिल्ह्यातील इतर शासकीय व खाजगी रुग्णालयातील जैव-वैद्यकीय कचर्यावरसुद्धा प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. या लोकार्पण सोहळ्याला आमदार वझाहत मिर्झा, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, हरिश कुडे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. कातकरी, डॉ. रवी राठोड, डॉ. आशिया, डॉ. शेख, डॉ. येलके, डॉ. गुजर, डॉ. शेंडे उपस्थित होते.