उद्धवा, कुठे आणून ठेवली शिवसेना?

    28-Jan-2022
Total Views |
प्रासंगिक
- मोरेश्वर बडगे
Shiv Sena : हिंदुत्वाच्या लाटेवर हिंदकळणार्‍या महाराष्ट्राच्या राजकारणात टिपू सुलतानने एन्ट्री मारली आहे. कोण आहे हा टिपू? 1750 मध्ये हा टिपू सुलतान म्हैसूरचा राजा होता. आता 270 वर्षांनंतर तो अचानक धुमकेतूसारखा प्रकटला आहे. मुंबईतल्या मालाड भागातल्या एका मैदानाला त्याचे नाव देण्याचा घाट काँग्रेसचे नेते आणि महाआघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी घातला आहे. प्रजासत्ताक दिनी नामकरणाचा प्रयत्न झाला तेव्हा भाजपा, बजरंग दलाने याचा विरोध करीत मोठे आंदोलन केल्याने राजकारण तापले आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपूचे नाव द्यायला कडाडून विरोध केला. टिपूने हिंदूंवर अत्याचार केले. तो आमचे वैभव होऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
 
 
uddhav-thacke
 
अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राहिला आहे. हे काही लपून नाही. तरीही त्यांच्याशी शिवसेना Shiv Sena पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती केली. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, झाले. मात्र, सध्या जे सुरू आहे ते भयंकर आहे. माझे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही म्हणणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना Shiv Sena हे सारे का खपवून घेत आहे? महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. म्हणून टिपू चालवला जात आहे का? आज ते टिपू चालवत आहेत. उद्या अफजलखान चालवतील, शाहिस्तेखान चालवतील. त्यांची दैवते वेगळी आहेत. तुमचा काय ब्रेक आहे? यांच्यासोबत तुम्ही किती बसणार? इतक्या वर्षांत शिवसेना Shiv Sena औरंगाबादचे संभाजीनगर करू शकले नाही आणि आता टिपू सुलतानाचे नावही रोखू शकत नाही. अयोध्येला चांगले दिवस येत असताना महाराष्ट्र लंगडतोय्.
 
  
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी नुकताच शिवसैनिकांशी Shiv Sena संवाद साधला. आम्ही भाजपा सोडला. हिंदुत्व सोडले नाही, असे उद्धव म्हणाले. पण मग आता टिपू सुलतान कबरीतून बाहेर येत असताना कुठे गेले उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व? ठाकरेंनी भाजपाची सोबत सोडली, हे महाराष्ट्राला अजिबात आवडलेले नाही. उद्धव यांच्याही हे लक्षात येत असावे. त्यामुळे की काय, ते वारंवार आपला निर्णय कसा बरोबर होता, हे सांगत आहेत. 25 वर्षे आम्ही युतीत सडलो, असे ते म्हणत असतील तर मग आता महाआघाडीत सडत आहेत, सडणार आहेत; त्याचे काय?
 
 
मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे उद्धव अडीच महिने घरी होते. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोणाकडे चार्ज दिला नाही. तो उठला नाही तर अवघड व्हायचे ही सुप्त भीती! राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांनी उद्धव यांना अडीच महिने घरबसल्या सांभाळले. पण उद्धव यांना झेलण्यासाठी पवारांनी महाआघाडीची सर्कस उभी केलेली नाही. पवारांचे ‘टार्गेट’ वेगळे आहे. त्यांना काँग्रेस संपवायची आहे. काँग्रेस संपवली की मग शिवसेनेला Shiv Sena सहज संपवता येईल, असा पवारांचा गेम आहे. वसंतदादा पाटील, सोनिया गांधी यांना पवारांनी सोडले नाही. ते उद्धवना सोडतील? कदापि नाही. भाजपाशी दगाबाजी करून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवली म्हणजे खूप तीर मारला, अशा हवेत उद्धव आहेत. पण राजकारणात ते अजून लिंबू-टिंबू आहेत. लोकसभा असो की बँक, यापुढे प्रत्येक निवडणूक जिंकायची, असे त्यांनी शिवसैनिकांना सांगितले. पण एकेका जागेसाठी पावसात भिजणारे शरद पवार जिंकू देतील तेव्हा ना! भाजपासोबत होती म्हणून आतापर्यंत शिवसेनेची Shiv Sena ठाकूरकी चालली. आता दोन्ही काँग्रेसवाले लचके तोडतील तेव्हा दालरोटीचा भाव कळेल. कारण, सरकारमध्ये एकत्र असले तरी बाहेर हे मोकाट सांड आहेत. बंगालच्या वाघिणीसारखे लढा, असे उद्धव म्हणाले. हा आमचा ढाण्या वाघ आहे, असे बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकाची ओळख करून देताना म्हणायचे. उद्धव वाघ म्हणाले नाहीत. बंगालच्या वाघिणीसारखे लढा म्हणत आहेत. उद्धव आता आपल्या शिवसैनिकांना वाघ मानत नाहीत, असा याचा अर्थ आहे. वाघ आहोत म्हणायचे आणि आपल्या मुलाला म्हणजे आदित्य यांना वरळीसारख्या अतिसुरक्षित मतदारसंघातून उभे करायचे. मग कुठे गेली वाघगिरी? उद्धवा, कुठे आणून ठेवली शिवसेना?
 
 
Shiv Sena मुख्यमंत्रिपद टिकविण्यासाठी उद्धव ठाकरेंना नको त्या तडजोडी कराव्या लागत आहेत. कुठलीही स्पष्ट भूमिका घेणे अवघड होत चालले आहे. नावाला मुख्यमंत्रिपद खिशात आहे, पण मलाईची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. सरकारमध्ये पहिल्या क्रमांकाचे. पण नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. कोण सुखी आहे? कर्मचारी, जनताच नव्हे तर मंत्रीही नाराज आहेत. एक मंत्री दुसर्‍याला सहकार्य करायला तयार नाही. राज्य अंधारात गेल्यास फक्त काँग्रेसला जबाबदार धरू नका, असा इशारा देऊन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पोटात गोळा आणला. अडीच महिन्यांपासून सुरू एस. टी. संपाकडे उद्धव बघ्याच्या भूमिकेने पाहत आहेत. साखर कारखाने विक्रीत अण्णा हजारेंनी 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढला. Shiv Sena उद्धव गप्प आहेत. कारण मग अजित पवार अंगावर येतील. नथुराम गोडसेवर चित्रपट येत आहे; पण काँग्रेसने विरोध केल्याने शरद पवार अस्वस्थ आहेत. कोरोनाच्या दोन लाटेत महाराष्ट्राला मोठा तडाखा बसला. लोक वार्‍यावर होते. शेतकर्‍यांच्या बांधावर जायचे सोडा; आता शेतकर्‍यांचे प्रश्न साध्या चर्चेलाही नाहीत. प्रजासत्ताक दिनी बीडमध्ये एका इसमाने मंत्री धनंजय मुंडे यांच्यापुढे जाळून घेण्याचा प्रयत्न केला. रस्त्याचे बोगस काम करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करा, अशी त्याची मागणी होती. सामान्य माणसाला न्याय मिळविण्यासाठी स्वत:चा जीव पणाला लावावा लागत आहे. पण सरकारमध्ये कोणीही गंभीर नाही. नुसता टाईमपास सुरू आहे. त्यात आता महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. उद्धव यांना तर पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत. धड महाराष्ट्र सांभाळता येत नसताना हे उत्तरप्रदेश, गोवा जिंकायला निघाले आहेत. एक सांगू का? उद्धव चक्रव्यूहात अडकले आहेत. गारद्यांच्या गराड्यात घेरले गेले आहेत. म्हणायला महाआघाडी. पण कोणाचा कोणावर विश्वास नाही. सारा संशयकल्लोळ. आता त्यांची सुटका नाही. भाजपाशी एवढी कटुता वाढवून ठेवली आहे की, आता परततो म्हटले तरी दोर केव्हाच कापले गेले आहेत. महाआघाडीत शिवसेना Shiv Sena सडेल आणि संपेल. पवारांचा तो छुपा अजेंडा आहे. उद्धव केव्हा जागे होतात ते फक्त पाहायचे. 
 
- 9850304123
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)