स्मृती इराणींची मौनीसाठी भावूक पोस्ट...

28 Jan 2022 12:07:10
मुंबई,
Smriti Irani अभिनेत्री (Mouni Roy) हिनं नुकतंच प्रियकर सूरज नांबियार (Suraj Nambiar) याच्याशी लग्नगाठ बांधली. सूरज आणि मौनीचा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. जिथे त्यांच्ये कुटुंबीय आणि काही मित्रमंडळीची हजेरी पाहायला मिळाली. मौनी आणि सूरजनं बंगाली आणि मल्याळी अशा दोन पद्धतींनी लग्न केलं. दोघांनीही आपआपल्या संस्कृतींना यावेळी मान दिल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर या लग्नाचे असंख्य फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले. कित्येकांनी या नव्या जोडप्याला त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मौनीला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये एका खास व्यक्तीचाही समावेश होता. ही खास व्यक्ती म्हणजे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी. 

mouni
 
Smriti Irani 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेमध्ये इराणी या मौनीच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यामुळं या ऑनस्क्रीन आईनं अतिशय भावनिकरित्या व्य़क्त होत लेकिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. नवविवाहित दाम्पत्याला खूप सारे आशीर्वाद, प्रेम आणि सूरज खरंच खूप भाग्यवान असल्याचं त्या एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून म्हणाल्या. 'ही मुलगी 17 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्य़ात आली. तेव्हा तिला फारसा अनुभव नाही, असं लोक म्हणत होते. प्रत्यक्षात मात्र हा तिचा मोठेपणाच होता की ती मित्र आणि कुटुंबासाठी आपुलकी, आनंद आणि आयुष्याचं सार घेऊन आली. त्यांच्या आयुष्यात मौनीचं असणं हे भाग्यच... ', असं त्यांनी लिहिलं. आज मौनी एक नवं आयुष्य सुरु करतेय, सर्व देवांची तिच्यावर कृपा असावी. तिला समृद्ध आणि निरोगी आयुष्य लाभो. तिच्या पतीसाठी इतकंच म्हणेन, तू खरंच नशीब काढलंस... खूरप सारे आशीर्वाद..., अशा सुरेख शब्दांत त्यांनी मौनीसोबतचं नातं सर्वांसमोर ठेवलं. ऑनस्क्रीन आईनं दिलेल्या शुभेच्छा पाहून मौनीनंही त्यांचे आभार मानले. मी कृतज्ञ आहे, खूप आठवण येते तुमची... असं म्हणत तिनंही मन मोकळं केलं.
Powered By Sangraha 9.0