TET घोळ...तब्बल ७ हजारांवर शिक्षक अपात्र

    28-Jan-2022
Total Views |
पुणे,
TET  शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. आता अशीच एक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलं आहे. पैसे घेऊन TET परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झालं आहे.
 
tet
TET  13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिले होते. राज्यातील शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. जे शिक्षक प्रमाणपत्र सादर करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला होता. 2018 मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. दरम्यान शिक्षकांकडून त्यांचे संपूर्ण नाव, MAHATET(महा टीईटी ) चा बैठक क्रमांक, पेपर क्रमांक, उत्तीर्ण वर्ष आणि शेरा ही संपूर्ण माहिती मागवण्यात आली होती.