पालक कबाब

healthy spinach receipe

    दिनांक :07-Jan-2022
|
-  हिवाळा स्पेशल
 
पालकाचा spinach आहारात समावेश व्हावा यासाठी या पालेभाजीच्या पौष्टीकतेचे नेहमीच वर्णन केले जाते. विशेषत: हिवाळ्यात पालक spinach खाणे विशेष आरोग्यवर्धक आहे. सध्याच्या रोगप्रतिकार immunity booster शक्ती वाढविण्याच्या काळात, भरपूर पोटॅशियम potasium आणि लोह iron असलेली पालक spinach  रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर मानली जाते. पण, नेहमी भाजी-पराठे यापेक्षा चविष्ट आणि आकर्षक रंगसंगतीचे पालक कबाब spinach kabab बनवून सहजतेने भाजीचा आहारात समावेश करता येतो. विशेषत: लहान मुलांसाठी हा पौष्टीक, बनवायला सोपा आणि चविष्ट पालक कबाब spinach kabab झटपट तयार करा. चला तर मग जाणून घेऊया पालक कबाबची spinach kababसोपी रेसिपी !
 

pk 
 
साहित्य -
पालक spinach kabab - २ कप (पालकाची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरलेली)
हळद, गरम मसाला, आमचूर कूट
चणाडाळीचे पीठ - २ चमचे
ब्रेड क्रंब- ३ टेस्पून breadcrumbs
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार तेल oil
बटाटे - २ उकडलेले potatoes
मटार - अर्धा कप green peas
आले - १ टीस्पून (किसलेले) ginger
धणे - २ टीस्पून
 
कृती -
पालक कबाब spinach kabab बनवण्यासाठी प्रथम बटाटे आणि मटर वाफवून घ्या. आता पालक spinach गरम पाण्यात टाकून किमान २ मिनिटे उकळवा आणि नंतर पाण्यातून काढून घ्या. पालक spinach थंड झाल्यावर त्यात उकडलेले बटाटे आणि मटर घाला. बटाटे आणि मटर कुस्करून पालकासोबत मिसळून घ्या. या मिश्रणात आता धणेपूड, गरम मसाला, आमचूर पावडर, थोडेसे बेसन, ब्रेड क्रंब आणि चवीनुसार मीठ मिसळून घ्या. यानंतर त्याला कबाबचा आकार द्या आणि ब्रेड क्रंबमध्ये रोल करून घ्या. यानंतर कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात कबाब तळून घ्या. कबाब छान सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम पालक कबाब spinach kabab टोमॅटो सॉस, दह्याच्या चटणीसोबत छान लागतात आणि झटपट फस्त होतात.