9 ते 15 जानेवारी 2022

    दिनांक :09-Jan-2022
|
साप्ताहिक राशिभविष्य
 
मेष - प्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न
या आठवड्याची सुरुवात आपणास आर्थिक लाभ देणारी आहे. त्यायोगे मान, सन्मान, प्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न राहील. मात्र, यामुळे एखादेवेळी अहंकार बळावण्याचा धोकादेखील निर्माण होऊ शकतो. एखाद्याशी भांडण उद्भवल्यास प्रथम स्वतःची बाजू तपासून पाहा. कार्यालयीन कामकाजात अडथळे, वादविवाद निर्माण होऊ शकतात. उत्तरार्धात मात्र मनस्ताप कमी होऊ शकेल. सुरुवातीस काहीसा खर्च वाढू शकतो. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील. युवावर्गाला विवाह योग लाभावेत.
शुभ दिनांक - 10, 11, 12, 14.
 
वृषभ - मानसिक-शारीरिक चिंता
या आठवड्यात आपल्याला काहीसा मानसिक व शारीरिक चिंता, वैचारिक कमकुवतपणा जाणवू शकतो. काही आर्थिक प्रश्नदेखील अचानक निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक विवंचनेचा हा आठवडा राहील. आपल्या कार्यक्षेत्रात किंवा कार्यालयात जबाबदारी सांभाळताना मेटाकुटीस याल. कामे विस्कळीत होऊ शकतात. आरोग्यासंबंधी काही तक्रारी निर्माण झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. गृहकलह, आपसात मतभिन्नता, गैरसमज निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या.
शुभ दिनांक - 9, 13, 14, 15.
 
मिथुन - आरोग्याकडे दुर्लक्ष नको
या आठवड्यात लाभलेले ग्रहयोग पाहता बरीच संमिश्र स्थिती आपल्या वाट्याला आलेली दिसते. मात्र, हा आठवडा जरा कसोटीचाच ठरणार आहे. आरोग्यविषयक काही त्रास उत्पन्न झाल्यास मुळीच दुर्लक्ष करू नये. छोटीशीही हयगय मोठे रूप घेऊ शकते. नोकरी-व्यवसायात मात्र समाधानकारक वातावरण राहील. सहकार्‍यांशी सलोखा ठेवण्याचा प्रयत्न असावा. त्यांच्या मदतीनेच या आठवड्यातील अडचणींमधून मार्ग निघू शकेल. थोडा संयम बाळगा, सारे चांगले घडेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक - 9, 11, 12, 15.
 
कर्क - खर्चिकपणाला आवर घाला
या आठवड्यात आपला खर्चिकपणा जरा अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे प्राप्त ग्रहस्थिती दर्शवीत आहे. सढळ हाताने खर्च करण्याची आपली सवय जरा आवरती घ्या. हे वगळता अनुकूल ग्रहस्थितीमुळे आपल्या कामकाजात प्रगती, नोकरी-व्यवसायात उद्दिष्ट्यपूर्ती करून आपला उत्साह टिकून राहणार आहे. तथापि, कौटुंबिक वातावरणात थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो. प्रिय व्यक्तींशी कलह टाळा. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. भागीदारीच्या व्यवसायात असल्यास आर्थिक व्यवहारात सावध राहा.
शुभ दिनांक - 9, 11, 13, 14.
 
सिंह - उत्कर्षाच्या संधी लाभणार
या आठवड्यात आपणास अनेक शुभयोग व उत्कर्षाच्या संधी लाभणार आहेत. आठवड्याच्या पूर्वार्धात राशिस्वामी सिंह सार्‍या अडचणींचा निपटारा करण्यास समर्थ आहे. तो आपल्या उत्कर्षाला सत्शीलतेचे बळ देणार आहे. दरम्यान, आठवडाअखेरीस काहींना आरोग्याबाबत किरकोळ तक्रारी उत्पन्न होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींना पोटाचे त्रास संभवतात. औषध-पथ्ये सांभाळावी. आर्थिक आघाडीवर समाधान राहील. व्यवसायात आवक चांगली राहील. कुटुंबात समाधानी वातावरण राहावे.
शुभ दिनांक - 10, 11, 13, 15.
 
rashi weekly
 
कन्या - आर्थिक प्रगतीला वेग
आपल्या कार्यक्षेत्रात उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण करणारा हा आठवडा आहे. Weekly horoscope आर्थिक बाजू उत्तम राहील. जोडीदाराकडूनही आर्थिक स्वरूपाच्या काही चांगल्या बातम्या मिळतील. भागीदारीत प्रगती व्हावी. काहींना उद्योग-व्यवसायासाठी घरापासून दूर जाण्याचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता राहील. कुटुंबासह प्रवास फायदेशीर ठरू शकतो. धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल. काही मंगलकार्याची मुहूर्तमेढ होऊ शकेल. काहींना आध्यात्मिक क्षेत्रातील सज्जनांच्या सहवासाचा लाभ मिळू शकेल.
शुभ दिनांक - 9, 13, 14, 15.
 
तूळ - मनोबल टिकविण्याची गरज
या आठवड्यात लाभलेले ग्रहमान पाहता आपणास उत्साह व मनोबल टिकवून ठेवण्यासाठी संयम बाळगण्याची गरज आहे. मेहनतीनेच आपणास आर्थिक स्थिती राखण्यात व वृद्धिंगत करण्यात सफलता मिळू शकेल. आठवड्याच्या सुरुवातीला स्थिती साधारण असली, तरी उत्तरार्धात परिश्रमाचे चीज होत असल्याचा आपल्याला आनंद लाभेल. कुटुंबात मतभेदाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नका. स्वभावात काहीशी तीव्रता निर्माण होऊ शकते. तिला आवर घाला. अडचणीत ज्येष्ठांचा सल्ला घ्या.
शुभ दिनांक - 9, 10, 11, 12.
 
वृश्चिक - वरचष्मा निर्माण होईल
या आठवड्यात आपल्या वाट्याला आलेली ग्रहस्थिती पाहता मौजमजा, प्रवास-पर्यटन, मंगलकार्ये, समारंभ यात आपला खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यातून मिळणारे सुख-समाधानही मोठेच असेल. कारण या आठवड्यात विविध मार्गाने पैशाची आवक सुरू राहून आर्थिक आघाडीवर चिंता राहणार नाही. कुटुंबात मंगलकार्याच्या सफल हालचाली होऊ शकतील. नोकरी-व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात करून आपला वरचष्मा निर्माण करू शकता. व्यावसायिक स्पर्धेत आपली आघाडी राहील.
शुभ दिनांक - 9, 11, 13, 15.
 
धनु - समाधानकारक वाटचाल संभव
आपणास सध्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यामुळे साडेसातीची झळ बरीचशी कमी झालेली असावी. यामुळे आपले मनोबल व उत्साह टिकून राहणार आहे. कार्यक्षेत्रातील वाटचाल समाधानकारक राहील. काहींना बदल करण्याचे योग लाभू शकतात. कुटुंबात आपला वरचष्मा राहील. सध्या आपल्या पायाला जणू भिंगरी लागली असेल. वारंवार प्रवासाचे योग येतील. प्रवासात सतर्क राहायला हवे. आरोग्याकडे लक्ष असावे. विशेषतः मधुमेह असलेल्यांनी काळजी घ्यावी.
शुभ दिनांक - 10, 11, 13, 14.
 
मकर - व्यावसायिक प्रगतीचा काळ
या आठवड्यातील ग्रहस्थिती आपल्या आर्थिक प्रगतीस अतिशय अनुकूल आहे. सध्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे व तो अनुकूल असल्यामुळे आपली कामे उत्तमरीत्या पूर्णत्वास जाऊ शकतात. आपल्याला विविध क्षेत्रात प्रगतीचे योग लाभणार आहेत. व्यावसायिक यश व आर्थिक प्रगतीचा हा काळ आहे. त्याचा लाभ घेण्याची गरज आहे. जोडीदाराचे व्यावसायिक सहकार्य मिळेल. भागीदारीतही यश मिळण्याचे योग प्रबळ दिसतात. काहींना लांबच्या प्रवासाचे योग येतील; मात्र त्यात दगदग टाळावी.
शुभ दिनांक - 9, 10, 12, 14.
 
कुंभ - कार्यपूर्तीचे समाधान मिळेल
या आठवड्यातील ग्रहस्थिती आपणास कार्यसिद्धी व मानसिक समाधान देणारी आहे. व्यवसायात उत्तम अर्थलाभ होईल. नोकरीत असलेल्यांना समाधानकारक वातावरण लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी व सौहार्द्राचे राहील. दरम्यान, काहींना आरोग्याच्या काही किरकोळ तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. स्वभावात काहीशी तीव्रता निर्माण होऊ शकते. यामुळे सहकार्‍यांशी मतभेद निर्माण होण्याचा धोका राहील. बोलून कोणाचे मन दुखवू नका. कुटुंबात सामंजस्य राखा.
शुभ दिनांक - 9, 11, 13, 15.
 
मीन - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल
या आठवड्यात आपल्याला सार्वत्रिक समाधानकारक ग्रहयोग लाभले आहेत. उपलब्ध ग्रहस्थिती व्यवसाय व कार्यक्षेत्रात विविध उपयुक्त योग निर्माण करणारी असून ती आर्थिक फायद्यासोबतच नवनवीन संधीदेखील उपलब्ध करून देऊ शकते. आपली व्यावसायिक व सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. काही हितशत्रू सक्रिय झालेले असतील तरी त्यांचा सहज बंदोबस्त होऊ शकेल. आठवड्याच्या उत्तरार्धात काहींना प्रवासाचे योग संभवतात. आपले छंद जोपासण्याचेही समाधान मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
शुभ दिनांक - 9, 11, 13, 15.