वात्सल्यमूर्ती हरपली!

Article on remembrance of Sindhutai Sapkal

    दिनांक :09-Jan-2022
|
आसमंत 
- गिरीश कुलकर्णी
 
ज्येष्ठ समाजसेवक सिंधुताई Sindhutai सपकाळ यांच्या निधनानं झालेलं दु:ख शब्दांमध्ये व्यक्त करण्याजोगं नाही. त्या सगळ्यांच्याच माई Sindhutai होत्या. माझ्याशी आणि ‘स्नेहालय' Snehalay परिवाराशीदेखील याच नात्यानं त्या जोडलेल्या होत्या. साधारणत: ३५ वर्षांपूर्वी माझा त्यांच्याशी परिचय झाला. त्या काळात ‘स्नेहालय'ची स्थापना करीत असताना माईंचंही काम सुरू होतं. माझ्या गुरू विजयाताई लवाटे यांचा आणि माईंचा Sindhutai चांगला स्नेह होता. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामध्ये Pune विजयाताईंबरोबर माझी आणि माईंची Sindhutai  भेट झाली. विजयाताई ‘मानव्य' Manavy या संस्थेच्या संस्थापिका होत्या. त्यांनी पुण्यातील लालबत्ती भागात कामाला सुरुवात केली होती. १९८० पासून त्या लालबत्ती भागातल्या मुलांसाठी वसतिगृह चालवायच्या. मुलांच्या राहण्याची व्यवस्था करायच्या. पुढे विजयाताईंमुळेच मी माईंच्या Sindhutai संपर्कात आलो. आमची ओळख वाढली आणि मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे ओढला गेलो. संवाद communication skills  त्यांची एक वेगळीच शैली होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यात अनौपचारिकता होती; जी प्रत्येकालाच भावत असे. त्यांच्या नित्याच्या भेटीगाठीतून अल्पावधीतच मला आणखी एक आई मिळाल्याची भावना जाणवू लागली.
 
 
ss
 
त्या Sindhutai नेहमीच प्रत्येकाशी ‘अरे-तुरे'मध्ये बोलणार, प्रेमानं जवळ घेणार, डोक्यावर हात फिरवणार... ही अनौपचारिकता आणि प्रेमळ स्पर्श, त्यातली आत्मीयता ही त्यांच्यातली खूप मोठी ताकद होती. ‘येरे माझ्या लेकरा' अशी साद घालत त्यांनी माझ्यासारखी अनेक मुलं जोडली. या सगळ्यांशी त्यांचं भावनिक नातं निर्माण झालं होतं. अशाच प्रकारे त्यांच्याबरोबर माझा सहप्रवास सुरू झाला. आम्ही नगरमध्ये काम करीत होतो. ताईंनी सुरुवातीला पुरंदरमधल्या Purandar एका छोट्या गावामध्ये काम सुरू केलं होतं. तिथे तीन ते चार वेळा जाण्याचा योग आला. पण ती जागा ब-यापैकी गैरसोयीची होती. तिथे जाण्यायेण्याची, पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण होती. साहजिकच त्या ठिकाणी देणगीदार philanthropist पोहोचत नव्हते. संस्थेचं काम ऐकून लोक छोटी मदत करतात, पण दीर्घकालीन मोठी मदत मिळविण्यासाठी, मोठ्या देणगीदारांना कामाशी जोडून घेण्यासाठी प्रत्यक्ष काम दाखवणं गरजेचं असतं. म्हणूनच आम्ही माईंना Sindhutai पुण्यामध्ये येण्याचा आग्रह करायचो. शिवाय माई Sindhutai  तिथे स्वत: सगळी कामं करायच्या. मुलांसाठी स्वयंपाक करणं, डोक्यावरून पाण्याचा हंडा वाहणं, भांडी घासणं ही कामं त्यांच्या नित्याची होती. म्हणजेच घरात आई Mother आपल्या मुलांसाठी आणि पाहुण्यांसाठी करते ते सगळं त्या करायच्या. खरं तर संस्थाचालक म्हणून काम करणारी कोणीही व्यक्ती ही कामं स्वत: करत नाही. त्यासाठी वेगळा सेवकवर्ग ठेवलेला असतो. पण माईंच्या संस्थेत हे दृश्य कधीच दिसलं नाही. म्हणूनच त्यांना बघितल्यानंतर ही केवळ संस्था चालवणारी स्त्री नसून सर्वप्रथम ती आई आहे, हे प्रकर्षानं जाणवायचं. त्यांच्यामध्ये नेहमीच अमर्याद करुणा दिसायची.
 
 
 
आयुष्यात त्यांनी खूप काही भोगलं होतं. माणसं अशा वेदना घेऊन एक तर रडत बसतो वा नैराश्यग्रस्त होतो. पण माईंनी या वेदनेला वात्सल्याच्या माध्यमातून व्यक्त केलं. वात्सल्यातून त्यांनी या वेदनेला प्रतिसाद दिला. माई फारशा हिशेबी नव्हत्या. किती आलं आणि किती गेलं याचा हिशेब मांडतील, एखादा माणूस पैसेवाला आहे म्हणून त्याच्याशी वेगळं वागतील, असा त्यांचा स्वभाव नव्हता. सगळ्यांशीच त्यांचा प्रेमाचा संवाद असे. एक किलोभर तांदूळ घेऊन येणा-या व्यक्तीशी बोलतील तशाच त्या एखाद्या नेत्याशी किंवा अभिनेत्याशी बोलायच्या. पुढे त्यांचे अनेक सत्कार झाले. त्यात अनेक सेलिब्रिटी celebrity, राजकारणातील मोठे नेते political leaders उपस्थित असायचे. पण मोठे लोक आहेत म्हणून त्या कधीही त्यांच्याशी वेगळं वागायच्या नाहीत. मला त्यांचं हे वागणं विलक्षण आवडायचं. सर्वांशी समान वागणं आणि त्यातही सर्वांप्रती मातृत्वभावना ठेवणं हे त्यांच्या वृत्तीतलं मोठेपण होतं. त्यांनी अनेक मुलांची आयुष्यं सावरली. त्यांना कामधंद्याला लावलं. अनेकांना त्यांनी स्वत:चं नाव दिलं. त्यांचा एक मुलगा रिक्षा चालवतो. नगरमध्ये Ahmednagar एका गावात पप्पू सपकाळ नावाचा त्यांचा मुलगा ‘गंगाधरबाबा छात्रावास' नावाची संस्था चालवतो. त्यांच्या ब-याच मुलांनी त्यांच्यासारख्याच संस्था सुरू केल्या आहेत.
 
काम करताना माईंना Sindhutai अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बरेचदा त्यांच्यापुढे मुख्य अडचण यायची ती महिला बालविकास विभागातल्या नियमांची. या नियमांवरून त्यांचे अधिकाऱ्यांशी बरेच वादविवाद व्हायचे. ‘आईला लेकरं सांभाळायला कोणाची परवानगी पाहिजे?'' असा रास्त प्रश्न त्या उपस्थित करायच्या. कोणी अनाथ, निराधार मुलं सांभाळत असेल तर त्यांना परवाना घ्यावा लागतो खेरीज ती मुलं बालकल्याण समितीकडून तुमच्याकडे यावी लागतात. त्या समितीतले लोक संबंधित संस्थेची पडताळणी करतात, कोणी न्यायाधीश त्या संस्थेची तपासणी करतो. माईंना हे सगळं अकृत्रिम वाटायचं. कारण त्या तर मुलांच्या आई होत्या आणि त्या आपल्या मुलांवर कसं आणि किती प्रेम करतात हे तिस-या कोणीतरी येऊन ठरवायचं, तपासायचं आणि त्यावर शेरे द्यायचे, ही बाब त्यांना दुखावून जायची. याप्रती त्या वेळोवेळी नाराजी व्यक्त करत म्हणायच्या, ‘‘समाजातल्या अनेकांना अनाथ मुलांसाठी काम करायचं आहे, पण या अडचणीत टाकणा-या नियमांमुळे त्यांना मनातली प्रेमभावना व्यक्त करता येत नाही. मी याच नियमांची शिकार आहे. संधी मिळाली असती तर मी येणा-या प्रत्येक मुलाचा सांभाळ केला असता,'' असंही त्या म्हणायच्या. म्हणूनच एकीकडे नियम-कायद्यांची बंधनं आणि दुसरीकडे वात्सल्य या संघर्षात त्यांना बराच काळ काढावा लागला. असं असलं तरी माईंनी Sindhutai अनेकांना आसरा दिला. त्यांच्या सहवासात येऊन दगड झालेल्या अनेकांच्या मनाला प्रेमाचा पाझर फुटला. माई Sindhutai एखाद्याला जवळ घेऊन प्रेमानं थोपटायच्या तेव्हा त्याचं मन माणुसकीनं भरून जायचं. माईंच्या कामाला शक्य ती सगळी मदत केली पाहिजे, असं त्यांना वाटायचं.
 
पुण्यात मांजरीमध्ये माईंच्या Sindhutai  संस्थेचं काम सुरू झाल्यावर त्यांना भेटणंं अधिक सोपं होऊ लागलं. आमच्या नियमित भेटीगाठी होऊ लागल्या. माझं आणि त्यांचं वैयक्तिक नातं असं होतं की, अहमदनगरमार्गे कोठेही जात असताना त्या आवर्जून ‘स्नेहालय'मध्ये थांबायच्या. कधी कधी त्या घरीही यायच्या. संस्थेत वा घरात आल्यानंतरही त्या कुटुंबातली आजी असावी, तशाच वावरायच्या. अ‍ॅडॉप्शन सेंटरमध्ये आल्या की त्या मुलांना मांडीवर खेळवत बसायच्या. गेस्ट रूममध्ये सगळी व्यवस्था केलेली असली, तरी त्या झोपण्याव्यतिरिक्त कधीच तिथे जायच्या नाहीत. त्या मुलं असणा-या विभागांमध्येच राहायच्या आणि त्यांना अंगाखांद्यावर खेळू द्यायच्या. मुलांना अंगाला हात लावू देणं, मांडीवर घेणं, मुलांनी केस ओढले तरी हसत कौतुकानं त्यांच्याकडे बघणं या प्रत्येक कृतीतून त्यांच्यातलं मातृत्व ठळकपणे जाणवायचं. त्या प्रत्येक वेळी एका वेगळ्या मातृहृदयी सामाजिक कार्यकर्तीला बघत असल्याचं समाधान मनात दाटून यायचं. ‘स्नेहालय'मधल्या एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांना जवळ घेत त्या म्हणायच्या, ‘‘या लेकरांना माझं आयुष्य मिळावं.'  मर्यादित आयुष्य लाभलेल्या त्या मुलांसाठी काम करीत असल्याबद्दल त्या आमची पाठ थोपटायच्या. आता पाठीवर पडणारी ती कौतुकाची थाप आम्ही गमावली आहे. 
 
अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वप्रेमात असतात. ते स्वत:च्या कामाविषयी भरभरून बोलतात, पण माई Sindhutai या सगळांपेक्षा वेगळ्या होत्या. मी त्यांच्याबरोबर कुठे गेलो तर त्या लोकांशी स्वत:च्या कामाविषयी न बोलता माझ्याविषयी सांगायच्या. समभावनेतून काम करणा-यांना ओळख मिळवून देणं, त्यांचा परिचय करून देणं हे त्यांच्या स्वभावातील एक वैशिष्ट्य होतं. विशेष म्हणजे त्यात कुठेही मोठी मदत करण्याचा कोणताही अभिनिवेश नसायचा. सामाजिक क्षेत्रात ही अत्यंत दुर्मिळ अशी बाब त्या निमित्तानं मला बघायला मिळाली. आपल्या कामाबरोबरच दुस-याच्या कामावर प्रेम करणं त्यांना शक्य होतं. कारण त्यांचं मन तेवढं विशाल होतं. या भावनेनं अनेक गरजू आणि नवोदितांना त्यांनी मदत केली. मागचा काही काळ त्या आजारी होत्या, त्या दरम्यान भेटलो. तेव्हा त्यांना ‘स्नेहालय' मध्ये विश्रांतीला येण्याचा आग्रह केला होता. तब्येतीनं साथ दिली तर नक्की येईल, असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. अलीकडे कोरोनानं त्या धास्तावल्या होत्या. अखेर आजारानं त्यांना आपल्यातून हिरावून नेलं. आज माई Sindhutai आपल्यात नाहीत. पण त्यांचा आदर्श आणि त्यांचे विचार नेहमीच आपल्याबरोबर असतील. माईंच्या Sindhutai स्मृतींना विनम्र अभिवादन...!