राजकारणाच्या रक्तरंजित मार्गावर काँग्रेस!

Congress सत्तेच्या राजकारणासाठी घृणास्पद वापर

    दिनांक :20-Nov-2022
|
आसमंत 
 - हितेश शंकर
 
Congress नुकत्याच दोन बातम्या आल्या. एक म्हणजे १९८४ च्या शीखविरोधी दंगलींसंदर्भात न्यायमूर्ती एस. एन. धिंग्रा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीचा सारांश अहवाल सर्वोच्च न्यायालयाने रेकॉर्डवर घेतला आहे. Congress दुसरी बातमी अशी की, सर्वोच्च न्यायालयाने १९९१ च्या राजीव गांधी हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरन आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींना त्यांची शिक्षेची मुदत संपण्यापूर्वीच सोडण्याचे निर्देश दिले. Congress शीखविरोधी दंगलीत गुन्हे दाखल करण्यात पोलिसांनी उदासीनता दाखविल्याचे एसआयटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. Congress राजीव हत्या प्रकरणात सोनिया गांधी दोषींच्या सुटकेच्या बाजूने असून काँग्रेसने या निर्णयाचा विरोध केला आहे. Congress सुटकेला विरोध करणारी काँग्रेस तीच आहे जी सुटकेचे समर्थन करणा-या पक्षासोबत तामिळनाडूमध्ये सत्तेत आहे आणि अजूनही युतीत भागीदार आहे. Congress हा विरोधाभास जनतेला दिसत नाही काय? कोणाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे?
 
 

asmt 
 
 
खरे तर काँग्रेस सुरुवातीपासूनच सत्तेच्या राजकारणासाठी अशा घृणास्पद घटनांचा वापर करीत आली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधींची हत्या झाली. Congress  ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. पण काँग्रेसने त्या हत्येचा राजकारणाचे हत्यार म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. महात्माजींच्या सुरक्षेतील प्रचंड त्रुटींपासून ते तिस-या गोळीपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले. पण काँग्रेस पक्षासाठी सत्य कळणे, प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणे महत्त्वाचे नव्हते. Congress त्यांच्यासाठी, या हत्याकांडाला राजकीय साधन बनवून, नव्याने स्वतंत्र लोकशाही असलेल्या भारतात दीर्घकाळ सत्ता हस्तगत करणे अधिक महत्त्वाचे होते. Congress परिणामी, अहिंसेच्या पुजा-याच्या हत्येनंतर त्यांच्या अनुयायांनी देशभर हिंसाचार सुरू केला. ठिकठिकाणी हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करून ठार मारले जात होते. हत्येचा आरोपी नथुराम गोडसेच्या जातीतील हिंदूंचा पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागात नरसंहार घडविण्यात आला. Congress ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळात पुण्यात चित्पावन ब्राह्मणांचे प्रचंड प्रमाणात शिरकाण झाले. पाहता पाहता हा हिंसाचार चित्पावन ब्राह्मणांचे वर्चस्व असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पसरला. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा यांचा समावेश आहे; जिथे शेकडो लोकांचे बळी गेले, हजारो घरे आणि दुकानांना आग लावण्यात आली, महिलांवर बलात्कार झाले. Congress
 
 
 

  
काँग्रेसने या हत्याकांडाच्या आडून राजकीय विरोधकांना निष्प्रभ करण्याचा अर्थात हुसकावून लावण्याचा खेळ सुरू केला. Congress या हत्याकांडाशी काहीही संबंध नसतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. संघाशी संबंधित किंवा सहानुभूती असलेल्या नेत्यांची कोंडी करण्यात आली. Congress एवढेच नव्हे, तर संघाशी संबंधित पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी पंधरवड्यापूर्वी सुरू केलेल्या ‘पाचजन्य' या साप्ताहिकालाही लक्ष्य करण्यात आले. न्यायालयाने संघावरील सर्व शंका आणि आरोप फेटाळून लावले असतानाही, आजही काँग्रेसला या हत्याकांडाचा राजकीय हत्यार म्हणून वापर सुरूच ठेवायचा आहे. काँग्रेसची ही हिंदुविरोधी भूमिका आणि सत्तेसाठी रक्तरंजित मार्ग अवलंबण्याची तिची सवय १९६६ च्या गोहत्या बंदीच्या आंदोलनातदेखील समोर आली. Congress राज्यघटनेच्या कलम ४८ मध्ये गोहत्या बंदी हे सरकारचे काम असल्याचे म्हटले आहे. मात्र, केंद्र सरकार तसे करत नव्हते. गोहत्या बंदीच्या मागणीसह देशातील आध्यात्मिक महापुरुष करपात्रीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हजारो साधूंनी ७ नोव्हेंबर १९६६ रोजी संसदेसमोर प्रचंड निदर्शने केली. Congress वास्तविक इंदिरा गांधी सरकारने गोहत्या बंदीचा कायदा करणे आवश्यक होते.
 
 
 
Congress मात्र, या सरकारने कायदा करणे तर दूरच; पण कायदा करण्याची मागणी करणा-यांवरच गोळीबार केला. अनेक साधू या गोळीबारात ठार झाले. सरकारने कायदा करण्याऐवजी निःशस्त्र साधूंची हत्या का केली? याचे उत्तर असे की, हा कायदा बनवल्याने एका विशिष्ट समुदायावर, लोकांवर त्याचा परिणाम झाला असता. Congress त्यामुळे या विशिष्ट समुदायावर परिणाम झाला असता? त्या समाजाच्या तुष्टीकरणासाठी साधूंची हत्या करण्यात आली. काँग्रेस सरकारचे तुष्टीकरणाचे धोरण १९८६ मध्ये शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला खटला रद्द करण्यापर्यंत सुरूच होते. इंदिरा गांधींच्या हत्येचा मुद्दाही काँग्रेसने आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरला. हा मुद्दा म्हणजे जणू काँग्रेसचे राजकीय हत्यारच होते. इंदिराजींच्या हत्येनंतर १९८४ मध्ये देशात उसळलेल्या शीखविरोधी दंगलीतील हल्लेखोर कोण होते? ते हिंदू नव्हते. Congress ते काँग्रेसचे गुंड होते. शिखांचे शिरकाण करण्यात या काँग्रेसी गुंडांचाच हात होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या दंगलींवर खेद व्यक्त करण्याऐवजी qकवा कारवाई करण्याऐवजी मोठा वृक्ष कोसळला की धरणाला थोडे हादरे बसतातच, असे म्हटले होते. इंदिराजींची हत्या एका शीख व्यक्तीने केल्याने शिखांसारख्या देशभक्त समुदायावर काँग्रेसने इंदिराजींच्या हत्येचा ठपका ठेवला. Congress किती लोक ठार झाले, किती महिला विधवा झाल्या, किती मुले अनाथ झाली; याने काँग्रेसला काही फरक पडला नाही.
 
 
दंगल पीडितांना न्याय देण्याबाबत तत्कालीन काँग्रेस सरकारची भूमिका काय होती, हे न्यायमूर्ती धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. या शीख हत्याकांडाचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागले असतानाही ख-या अर्थाने पश्चात्ताप न करता एका शीख व्यक्तीला कठपुतळी पंतप्रधान बनवून काँग्रेसने राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारूआ यांच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकात मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवून गांधी कुटुंबाने पडद्याआडून सत्ता कशी नियंत्रित केली याचा संपूर्ण तपशील दिलेला आहे. Congress मात्र, काँग्रेसच्या या तुष्टीकरणामुळे शिखांच्या जखमा भरल्या नाहीत. आता नोव्हेंबरमध्ये इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये गुरुनानक देव महाराज यांच्या प्रकाशपर्वावर काँग्रेस नेते कमलनाथ यांना सरोपा भेट दिल्यामुळे शीख समुदाय दुखावला आहे. हे जखमांवर मीठ चोळणे नाही तर दुसरे काय आहे? Congress  दोषींचा सन्मान केला तर इंदूरला कधीच येणार नाही, अशा शब्दात पंजाबचे प्रख्यात कीर्तनकार मनप्रीत सिंग कानपुरी यांनी आपला संताप व्यक्त केला. Congress याच कमलनाथ यांनी मंदिर आणि हिंदू देवतेच्या आकाराचा केक कापला. हे असे करून ते नेमका कोणता संदेश देऊ इच्छित आहे?
 
 
वायनाडमध्ये राहुल गांधींच्या विजयानंतर काँग्रेसने Congress केरळला आपला नवा बालेकिल्ला बनवण्यास सुरुवात केली आहे. हे राज्य राजकीय हत्यांसाठी आधीपासूनच ओळखले जाते. आता राजकीय फायद्यासाठी मुस्लिम लीगचा फायदा करून घेण्याचा डाव काँग्रेसने आखला आहे. काँग्रेसच्या मुस्लिम समर्थक धोरणांवरून आणि कार्यक्रमांवरून हे स्पष्ट होते. यावरून केरळमध्ये नव्या प्रकारचे रक्तरंजित राजकारण सुरू होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. Congress समाज आणि देश श्रेष्ठ की राजकीय फायदा याचा विचार काँग्रेसला करावाच लागेल. समाजाची विभागणी करून, मतांसाठी समाजाची व्होटबँक खूश करून समाजाचे विघटन होईल; एकजूट होणार नाही. ७४ वर्षांचा इतिहास तुमच्या समोर आहे. Congress रक्तपातावर आधारित राजकीय लाभ फार काळ टिकणार नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे. याचा परिणाम काँग्रेस भोगत आहे, पण आजही हा पक्ष सुधारणा करताना दिसत नाही. Congress हे धोरण कुठे नेणार याचा विचार काँग्रेसला करावा लागेल.
 
८१७८८१६१२३