20 ते 26 नोव्हेंबर 2022

    दिनांक :20-Nov-2022
|
साप्ताहिक राशिभविष्य 

saptahik 
 
 
मेष : विशेष अर्थलाभ घडावा
Weekly-Horoscope : कुणाच्या बदली किंवा निवृत्तीमुळे मार्गातील अडथळा दूर होऊन आपले महत्त्व वाढीस लागेल. यामुळे नोकरीत अतिरिक्त पदभार, पदोन्नती तसेच विशेष अर्थलाभ घडू शकतो. सप्ताहाच्या उत्तरार्धात स्वतःच्या आरोग्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. खर्चावर नियंत्रण ठेवावयास हवे. हवामान बदलामुळे संक्रमित होणार्‍या आजारांची लागण होऊ शकते. सप्ताहाच्या पूर्वार्धात प्रलंबित कामांना वेग मिळेल. नवीन ओळखी लाभप्रद ठरतील. व्यवसायात स्पर्धा वाढेल. कुटुंबातील वातावरण मात्र समाधानाचे राहील.
शुभ दिनांक - 21, 22, 23, 26.
 
 
वृषभ : मनोधैर्य राखणे आवश्यक
या सप्ताहात काही चांगले लाभ आपल्याला अवश्य मिळावेत. विशेषतः व्यावसायिकांना उत्तम राहील. मात्र, या सार्‍यात काहींना नवी गुंतवणूक, शेअर बाजारातील व्यवहार करताना सतर्कता बाळगायला हवी. नोकरीत काहीसे तणावाचे वातावरण राहील. काही चिंता सतावू शकतील. अशा स्थितीत मनोधैर्य राखणे महत्त्वाचे ठरेल. अधिकारीवर्गाचे आदेश व नियमांचे उल्लंघन करू नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. काहींना प्रवासाचे योग यावेत.
शुभ दिनांक - 20, 21, 25, 26.
 
 
मिथुन : उत्तम संधीचा लाभ घ्या
Weekly-Horoscope :  हा आठवडा आपणास काहीशी दगदग, मनस्ताप व प्रसंगी आरोग्याबाबत काळजी घ्यावयास लावणारा ठरू शकतो. काहींना नोकरी, व्यवसायातील एखादी उत्तम संधी व्यर्थ जाण्याचा प्रसंगदेखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यासंदर्भात सतर्क राहणे आवश्यक आहे. परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊनच पुढचे निर्णय घ्यावयास हवेत. काहींना लांबचे प्रवास वा बदलीचे योग संभवतात. नोकरी बदलाची संधी घेऊ इच्छिणार्‍यांना या काळात हालचाल करावयास हरकत नाही. मात्र, कोणत्याही प्रसंगी गाफील राहून चालणार नाही.
शुभ दिनांक - 22, 23, 24, 25.
 
 
कर्क : संयम बाळगण्याची गरज
या सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या मनात संभ्रमावस्था निर्माण होण्याची बरीच शक्यता आहे. त्यामुळे आपणास सार्‍याच बाबतीत संयम बाळगण्याची गरज आहे. काही चांगल्या योगांना पाप ग्रहांनी घातलेला वेढा बघता आपणास ही खबरदारी घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे बराच चढ-उतार आपणास अनुभवावा लागू शकतो. एखादे जुने आजारपण असलेल्यांनी काळजी घ्यावी. वाहने सांभाळून चालवावी. वीज व आगीची उपकरणे सावधपणे वापरावीत. आकस्मिक खर्चांनी डगमगून जाऊ नका. कुटुंब मदतीस येईल.
शुभ दिनांक - 20, 22, 24, 26.
 
 
सिंह : चढउतार दर्शविणारा काळ
Weekly-Horoscope :  या सप्ताहात आपणास नोकरी, व्यवसाय या दृष्टीने काही उत्तम संधीची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे कुणी यात बदलाची अपेक्षा बाळगत असेल तर त्याला या संधीचा लाभ घेता येऊ शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनादेखील प्रगतिपथावर वाटचाल करता येईल; मात्र भागीदारावर पूर्णपणे विसंबून चालणार नाही. विशेषतः आयटी क्षेत्रातील मंडळींना पूर्वार्ध उत्तम ठरावा. आठवडा अखेरीस मात्र या सुखकर वाटचालीत जरा बाधा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चढ-उतार दर्शविणारा हा काळ आहे.
शुभ दिनांक - 20, 21, 24, 25.
 
 
कन्या : तारतम्य ठेवून वागावे
या आठवड्याच्या सुरुवातीस आपणास काही उत्तम संधी लाभू शकणार असून उत्तरार्धात मात्र काहीसे औदासीन्य निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः नोकरीत असणार्‍या व त्यातही इलेक्ट्रॉनिक्स- आयटी क्षेत्रात असणार्‍यांना नोकरीच्या पूर्वार्धात अतिशय चांगल्या संधी लाभू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. नवीन परिचय दीर्घकालीन लाभ देण्यास सहायक ठरतील. प्रतिष्ठा उंचावेल. उत्तरार्धात काहींना वैवाहिक जीवनाच्या संदर्भात विचित्र फले मिळू शकतात. त्यामुळे तारतम्य ठेवून वागणे इष्ट ठरेल.
शुभ दिनांक - 20, 22, 23, 24.
 
 
तूळ : आर्थिक सबलीकरणास पुष्टी
Weekly-Horoscope : या आठवड्यात आपणास आर्थिक बाजूच्या सबलीकरणासाठी काही उत्तम योग लाभण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात उत्तम संधी, धनलाभाचे योग निर्माण होत आहेत. काहींच्या वारशाच्या प्रकरणांवर तोडगा निघून त्यातूनही लाभ होऊ शकेल. मोठे वाहन, घर-जमीन अशा स्वरूपाच्या मोठ्या खरेदीने घरात आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण होईल. मुलांकडून प्रगतिकारक वार्ता कळल्याने आनंदात भरच पडेल. कुटुंबासोबत प्रवास, तीर्थाटनाच्या योजना आखल्या जाऊ शकतात.
शुभ दिनांक - 22, 23, 24, 25.
 
 
वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्यावी
या आठवड्यात आपणास काही उत्तम धनयोग संभवतात. जुना अडलेला पैसा हाती येऊ शकेल. वारशाच्या प्रकरणांवरदेखील मार्ग निघू शकेल. मात्र, असे हे सारे सुखमय व सुलभ वातावरण असतानाच आपणास आरोग्याची काळजी घेणेही जरूरी आहे. काही ग्रहयोग यादृष्टीने फारसे सुखद नाहीत. काहींना अपघाताची संभावना, तर काहींना छोटी-मोठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. त्यामुळे योग्य सतर्कता बाळगली पाहिजे. जुने त्रास असणार्‍यांनी वेळीच काळजी घ्यावी. विवाहेच्छूंना जोडीदार लाभण्याचे योग.
शुभ दिनांक - 20, 24, 25, 26.
 
 
धनु : कार्यक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण
Weekly-Horoscope :  या आठवड्यात लाभणार्‍या काही उत्तम ग्रहस्थितीमुळे कदाचित एखादी मोठी खरेदी करणे किंवा मोठ्या योजनेची आखणी करणे संभव होणार आहे. स्थायी संपत्तीत वृद्धी करणारा हा योग आहे. खर्च मोठा असला, तरी तो सहज उचलता येणार आहे. घर, वाहन यासारख्या मोठ्या खरेदीला मूर्त रूप लाभू शकेल. यामुळे कुटुंबात आनंद निर्माण होणार. व्यवसाय तसेच नोकरीतील वातावरण बरेच उत्साहवर्धक राहील. व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यासाठी हा काळ श्रेयस्कर ठरेल. अपेक्षित धनलाभ होऊ शकेल.
शुभ दिनांक - 20, 22, 23, 26.
 
 
 
मकर : अपेक्षित लाभ साधता येणार
हा आठवडा आपणास सर्व क्षेत्रात उत्तम योग देणारा ठरू शकतो. या द़ृष्टीने विशेषतः सप्ताहाचा उत्तरार्ध अतिशय उत्तम व शुभफलदायी ठरणार आहे. त्यामुळे व्यवसायादी क्षेत्रात आपले नशीब आजमावू पाहणार्‍यांनी उत्तम योग पाहून त्याचा शुभारंभ करावयास हरकत नाही. तसेच अगोदरपासून व्यवसायात असणार्‍यांना मरगळ झटकून नव्याने, नव्या उमेदीने मुसंडी मारावयास काळ उत्तम ठरेल. नोकरीत नेहमीच्या चाकोरीतून अपेक्षित लाभ साधता येऊ शकेल. अधिकार्‍यांची मर्जी राहील. आर्थिक लाभ होईल.
शुभ दिनांक - 20, 22, 24, 25.
 
 
कुंभ : उधळपट्टी स्वभावाला खतपाणीच
Weekly-Horoscope :  या आठवड्यात आपल्या खर्चिक व काहीशा उधळपट्टीच्या स्वभावाला खतपाणीच मिळणार असे दिसते. त्यामुळे आपले आर्थिक अंदाजपत्रक नक्कीच बिघडू शकतेे. पैशाच्या आवकपेक्षा जावक किंवा खर्च मोठाच असणार आहे. ‘खर्चाला वाटा हजार’ हे आपल्याला समजले असले, तरी ते पटून त्यानुसार वर्तन घडणे जरा कठीणच आहे. त्यामुळे आपल्या खिशावर नजर ठेवूनच खर्च उभारावा. मित्रवर्ग व कुटुंबाचे पुरेपूर सहकार्य मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात काही धनवृद्धीकारक योग लाभू शकतात. काहींना प्रवासाचे योग यावेत.
शुभ दिनांक - 22, 23, 25, 26.
 
 
मीन : आर्थिक तंगी नसणार
Weekly-Horoscope :  या आठवड्यात काहींना आरोग्यविषयक चिंता, खर्चवाढ, अचानक त्रास आणि तापदायक प्रवास यांनी बेजार करणारे योग संभवतात. कामांना विलंब, योजना पुढे ढकलल्या जाणे यामुळे मन:स्ताप होऊ शकतो. काहींना कायद्याचा फटकादेखील या काळात जाणवू शकतो. विशेषतः आठवड्याच्या पूर्वार्धात हा त्रास प्रकर्षाने जाणवेल. तथापि, आर्थिक घडी मात्र विस्कटण्याची शक्यता नाही. सावकाश वा विलंबाने का होईना, परंतु आपली आर्थिक आवक सुरू राहील व कोणत्याही प्रकारची तंगी जाणवणार नाही असे वाटते.
शुभ दिनांक - 20, 21, 25, 26.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746