आता वर्क फ्रॉम मून !

    दिनांक :22-Nov-2022
|
नवी दिल्ली, 
नासाने चंद्रावर  (NASA) आपले तळ निर्माण करणार आहेत आणि भविष्यातील इतर मोहिमांसाठी चंद्रावर मानवांची दीर्घकालीन उपस्थिती सुनिश्चित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल यशस्वीरित्या उचलले आहे. आर्टेमिस मिशनच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी प्रक्षेपणामुळे दशकाच्या शेवटी चंद्रावर राहणे आणि काम करणे शक्य होणार असल्याचे नासाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे सर्व सामान्यांसाठी होणार नसले तरी अंतराळवीरांसाठी ही मोठी उपलब्धी असेल. नासाचा हा दूरगामी प्रयत्न मंगळावरील भविष्यातील मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
 

tretret  
 
नासाच्या आर्टेमिस (NASA)  मिशनचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. आता ओरियन अंतराळयान चंद्राच्या विशेष कक्षेकडे वाटचाल करत आहे. ही मोहीम नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा पहिला टप्पा आहे, ज्याच्या तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात, नासा पहिली महिला आणि पहिला अश्वेतवर्णी पुरुष चंद्रावर पाठवणार आहे आणि या मोहिमेद्वारे चंद्रावर मानवाची उपस्थिती सुनिश्चित केली जावी. नासाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की 2030 पर्यंत मानव चंद्रावर राहण्यास आणि काम करण्यास सुरवात करेल.
या मोहिमेबाबत नासाच्या  (NASA) ओरियन लुनार स्पेसक्राफ्ट प्रोग्रॅमचे प्रमुख हॉवर्ड हू म्हणतात की 2030 पूर्वी मानव चंद्रावर दीर्घकाळ वास्तव्य करू लागतील आणि याचा अर्थ चंद्रावर मानवांसाठी राहण्यायोग्य जागा असेलच असे नाही. ओरियनचे मुख्य व्यवस्थापक हू हे नासाच्या ओरियनच्या डिझाइन, विकास, उत्पादन आणि ऑपरेशनसाठी जबाबदार आहेत. सध्या, ओरियनची चंद्रावर पाठविण्यासाठी कोणत्याही क्रूशिवाय चाचणी केली जात आहे, ज्यामध्ये ते चंद्रावर प्रदक्षिणा केल्यानंतर परत येईल. हू यांनी सांगितले की या दशकात निश्चितपणे जग चंद्रावर दीर्घकाळ राहणारे लोक पाहतील.